शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती कायद्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप होत होता. काही तरतुदी सर्वोच्च न्यायालयाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्णयात बसत नव्हत्या. त्यामुळे हा कायदा परत पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.


सभागृहात काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी शक्ती कायद्याचे काय झाले, अशी विचारणा केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संविधानाने राज्य व केंद्राला काही अधिकार दिलेले आहेत. कोणताही कायदा करताना राज्याचे अधिकार हे केंद्रीय कायद्यांवर अधिक्षेप करू शकत नाहीत. काही प्रमाणात जिथे समवर्ती सुचीतील विषय असतील तर राष्ट्रपती त्याला मान्यता देऊ शकतात. शक्ती कायद्यामुळे संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप होत होता. त्यामुळे हा कायदा परत करण्यात आला आहे. शक्ती कायद्यात ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्या तरतुदी केंद्राच्या नव्या तीन कायद्यांमध्ये आलेल्या आहेत. त्याशिवाय, काही तरतुदी या सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयात बसत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी