Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक विद्यार्थी, महिला आणि बालकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावी, असे आवाहन शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. ( Bhatke Vimukta Samaj)


महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटर सभागृहात राज्यस्तरीय ‘भटके-विमुक्त दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, भटके-विमुक्त समाजातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक अडचणींसोबतच लिंगभेदाचाही सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांच्या शिक्षणासाठी, आर्थिक स्वावलंबनासाठी, सुरक्षिततेसाठी आणि कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे.



उपजीविकेसाठी विविध ठिकाणी फिरून वस्तूंची विक्री करणाऱ्या नागरिकांकडे संशयाने पाहण्याची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना सन्मानाने आणि समान संधीने जगता आले पाहिजे. समाजातील अनेक विद्यार्थी आणि बालके अजूनही सरकारी योजनांच्या लाभापासून दूर आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची विभागनिहाय माहिती घेऊन कोणताही घटक योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी म्हटले. ( Government Schemes)


भटके-विमुक्त समाजाची पारंपरिक वेशभूषा, बोलीभाषा, कला आणि लोकसंस्कृती ही त्यांची महत्त्वाची ओळख आहे. या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासोबतच नव्या पिढीने शिक्षणाला प्राधान्य देऊन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.


शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचल्यास अधिक नागरिकांना त्याचा फायदा घेता येईल. समाजाच्या विकासासाठी शासन आणि संबंधित विभागाला आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाहीही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.


कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान व परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ( Women Empowerment)


Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन