Vidya Wires Share Listing: विद्या वायर्स आयपीओला चांगले सबस्क्रिप्शन मिळूनसुद्धा घोर निराशा प्राईज बँडवर शेअर सूचीबद्ध

मोहित सोमण: विद्या वायर्स (Vidya Wires Limited IPO) कंपनी आज बाजारात सूचीबद्ध (Listed) झाली आहे. मात्र आयपीओला सूचीबद्ध होताना अपेक्षित यश आलेले नाही. आयपीओतील मूळ प्राईज बँड (Price Band) असलेल्या ५२ रूपयांवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. त्यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर शेअर सूचीबद्ध झाल्याने गुंतवणूकदारांना अपेक्षित फायदा झालेला नाही. तसेही तज्ञांच्या मते केवळ ३.५ रूपये प्रति शेअर प्रिमियमसह शेअर यापूर्वी सुरु होता. मात्र आयपीओनंतर शेअरची रडतखडत सुरूवात झाली असली तरी थोड्या वेळासाठी शेअर आज ५% इंट्राडे उच्चांकावर पोहोचल्याने ५४.६० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. खासकरून एकूण २८.५३ पटीने सबस्क्रिप्शन मिळवले असले तरी जीएमपीतील नुकसान आजही कायम राहिले आहे. एकूण सबस्क्रिप्शनपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५.४५ पटीने, किरकोळ गुंतवणूकदारांकडून २९.५८ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५५.९४ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले. प्रामुख्याने कंपनीच्या फंडामेटलमध्ये तिमाही बेसिसवर मार्च ते जून दरम्यान घसरण झाल्याने तज्ञांनी आयपीओसाठी संमिश्र कल दिला होता.
कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर २५% अधिक महसूल मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर या ५९% वाढ झाली आहे. मार्च तिमाहीतील ४०.८७ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीत १२.०६ कोटींवर करोत्तर नफा (PAT) घसरला आहे. तर ईबीटा (EBITDA) मार्च तिमाहीतील ६४.२२ कोटींच्या तुलनेत या जून तिमाहीत १८.६७ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल आयपीओनंतर ११०६ कोटीवर पोहोचले होते.


३ ते ५ डिसेंबर कालावधीत हा आयपीओ बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला होता. ज्यामध्ये ३०० कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओत ५.२७ कोटीतील शेअरपैकी फ्रेश इशू म्हणून २७४ कोटींचे शेअर उपलब्ध होते तर उर्वरित २६ कोटी मूल्यांकनाचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून उपलब्ध होते. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ९० कोटींचा निधी प्राप्त केला होता.


१९८१ मध्ये स्थापन झालेली विद्या वायर्स लिमिटेड तांबे आणि अँल्युमिनियमच्या तारांचे उत्पादन करते. कंपनी विविध उद्योगांसाठी वाइंडिंग आणि कंडक्टिव्हिटी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यासह इंजिनिअर्ड वायर, तांबे पट्ट्या, कंडक्टर, बसबार, विशेष वाइंडिंग वायर, पीव्ही रिबन आणि अँल्युमिनियम पेपर-कव्हर स्ट्रिप्स या उत्पादनांचाही कंपनीच्या पोर्टफोलिओत समावेश आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आयपीओतून मिळालेल्या निधीचा वापर कंपनी इतर खर्चासाठी करणार होती. श्यामसुंदर राठी, शैलेश राठी, शिल्पा राठी हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.

Comments
Add Comment

Cyclone Arnab : चक्रीवादळ 'अर्णब'चा पुढील मार्ग कोणता? लखनऊ आणि गोरखपूरवरील प्रभावाबाबत महत्त्वाचा अंदाज

Weather News: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णब’ चक्रीवादळ 28 ऑक्टोबर 2026 रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर

Vishnubala : सयाजी शिंदेंचा मुलगा सिद्धार्थ करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ‘विष्णूबाळा’ चित्रपटातून बापलेकाची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता नव्या कलाकारांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांची पुढची पिढी

Nashik : नाशिकमध्ये राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन

नाशिक : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आज, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी नाशिक येथील पोलीस परेड ग्राउंड हेलिपॅडवर आगमन

NCP : राष्ट्रवादीची मोठी घोषणा! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूर

Jio Platforms IPO Listing : जिओच्या शेअरची दमदार एंट्री ! लिस्टिंग होताच गुंतवणूकदारांना एका लॉटवर 'इतका' नफा

मुंबई : शेअर बाजारात बुधवारी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओच्या लिस्टिंगकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. अखेर

Captain Smit Machhar : विमानातील दहशतवादी हल्ल्याचा सामना करणाऱ्या स्मित मच्छार यांचा UAE कडून सन्मान; ‘फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II’ पुरस्कार जाहीर

Captain Smit Machhar : विमानातील गंभीर हल्ल्याच्या प्रसंगी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्य दाखवणारे फ्लायदुबईच्या