विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची दीड हजारात विक्री?; चौकशीचे आदेश

नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारे पास दीड हजार रुपयांत विकले जात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. या प्रकारांमुळे दहशतवादीही सहज आत शिरू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी दिले आहेत.


गेल्या वर्षी काही आमदारांच्या तक्रारीनंतर अभ्यागतांसाठी दररोजचे प्रवेश पास देण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही हिवाळी अधिवेशन सुरू होताच सर्व सदस्यांना पासशिवाय कोणालाही विधानभवन परिसरात आणू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दोन दिवसांत २३ आमदारांनी विनापास लोकांना आत नेल्याचे उघड झाले होते.


आता हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी (१२ डिसेंबर) शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी थेट विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करीत खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्यांकडे आमदारांचे पत्र असूनही त्यांना पास मिळाले नाहीत आणि ते दिवसभर बाहेर उभे होते. पण बाहेर दीड हजार रुपये देऊन पास मिळत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने विधिमंडळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दीड हजारात पास मिळत असेल तर दहशतवादी कधीही आत येऊ शकतो. कुणी पैसे घेऊन हे पास जारी केले, याची चौकशी व्हावी”, अशी मागणी त्यांनी केली.


हेमंत पाटील यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच मर्यादित पास देण्याचे सांगितले होते. मात्र आज विधिमंडळ परिसरात एवढी गर्दी आहे की नीट चालता येत नाही. हे सगळे लोक आत कसे आले? इतक्या मोठ्या प्रमाणात पास कुणी आणि का जारी केले?”असे सवाल त्यांनी केले. दोन्ही आमदारांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष कृपाल तुमाने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी