पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास


इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्विसेज इंटेलिजेंसचे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना लष्करी कोर्ट मार्शलने १४ वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयएसआयच्या प्रमुखाला एवढ्या मोठ्या स्तरावर शिक्षा होण्याची ही पाकिस्तानी इतिहासातील पहिलीच घटना आहे.


फैज हमीद यांना 'ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट'चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतर गंभीर आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कराची मीडिया विंगने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये 'फील्ड जनरल कोर्ट मार्शल'द्वारे फैज हमीद यांच्याविरुद्ध कार्यवाही सुरू करण्यात आली होती. १५ महिने चाललेल्या या प्रक्रियेनंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि ११ डिसेंबरपासून ही शिक्षा लागू करण्यात आली. फैज हमीद यांच्यावर गुपित कायद्याचे उल्लंघन, अधिकारांचा गैरवापर, सरकारी संसाधनांचा दुरुपयोग यांसारखे गंभीर आरोप सिद्ध झाले आहेत. फैज हमीद हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. हमीद हे २०२०-२१ मध्ये आयएसआय प्रमुख असताना, अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यावर ते अचानक काबुलमध्ये एका हॉटेलमध्ये 'चहा' पिताना दिसले होते, ज्यामुळे ते जगभरात चर्चेचा विषय बनले होते. आयएसआय प्रमुख पदाव्यतिरिक्त त्यांनी पेशावरचे कॉर्प्स कमांडर पदही सांभाळले होते. सध्या पाकिस्तानी लष्कर फैज हमीद यांची राजकीय घटकांशी असलेली कथित संगनमत आणि अस्थिरतेशी संबंधित प्रकरणांची वेगळी चौकशी करत आहे. या प्रकरणातही त्यांना शिक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र, लष्कराने फैज हमीद यांना अपील करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे