'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याचा शेवट गोड! मेटल, रिअल्टी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी सेन्सेक्स ४४९.५३ व निफ्टी १४८.४० अंकाने उसळला मात्र.....

मोहित सोमण:आज आठवड्याचा शेवट गोड झाला आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ कायम राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी चांगल्या स्तरावर स्थिरावला आहे. सेन्सेक्स ४४९.५३ अंकाने उसळत ८५२६७.६६ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १४८.४० अंकाने उसळत २६०४६ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व बँक निफ्टीतील रॅली अखेरच्या सत्रात मर्यादित तेजीत राहिल्याने अपेक्षित वाढ बाजारात झाली नाही. मात्र मेटल, रिअल्टी शेअर्सने केलेल्या कामगिरीचा आधारे बाजारात बुलिश पँटर्न कायम राहिला आहे. विशेषतः युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून बोलणी झाल्याचे नेतृत्वाने स्पष्ट केल्यानंतर बाजारात सकारात्मकता कायम होती. मात्र अद्याप या द्विपक्षीय करारात निश्चितता आली नसल्याने काही प्रमाणात अस्थिरतेचा 'अंडरकरंट' आज कायम राहिला आहे. आजही मिड कॅप शेअर्सने अखेरच्या सत्रात कमाल केली असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. बाजारात सर्वाधिक वाढ मेटल (२.६२%), रिअल्टी (१.५३%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.४६%), तेल व गॅस (१.११%) निर्देशांकात झाली घसरण एफएमसीजी (०.२४%), मिडिया (०.०४%) निर्देशांकात झाली आहे.


युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात वातावरण कायम राहिले आहे. मेटल शेअर्सच्या जोरावर आज शेअर बाजारात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात झाल्यानंतर तज्ञांच्या मते या वर्षी आरबीआयही ५% पातळीवर रेपो दर स्थिरावू शकते असे म्हटले असल्याने सातत्याने बँक निफ्टीत रॅली झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. याखेरीज कमोडिटी बाजारातील परिस्थिती आज नियंत्रणात असली तरी रूपयात झालेल्या निचांकी कामगिरीचा फटका बाजारात बसला. आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील विक्रीत वाढ केली असल्याची शक्यता असली तरी घरगुती गुंतवणूकदारांनी अंशतः नफा बुकिंग करत दुसरीकडे आपली गुंतवणूक वाढवली. एकूणच बाजारातील मजबूत फंडामेंटल आज शेअर बाजारात परावर्तित झाले.


आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सगळ्याच निर्देशांकात तेजीचा अंडरकरंट कायम राहिला. त्यामुळे एकाही निर्देशांकात घसरण झाली नाही. सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (१.४५%), हेंगसेंग (१.६२%), कोसपी (१.३६%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२२%), एस अँड पी ५०० (०.२१%) निर्देशांकात वाढ झाली असून नासडाक (०.२६%) निर्देशांकात घसरण झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ टीआरआयएल (१७.१६%), अनंत राज (९.०२%), हिंदुस्थान झिंक (७.४६%), जीएसआर एअरपोर्ट (६.३०%), सीसीएल प्रोडक्ट (५.९७%) सारडा एनर्जी (५.१३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण टाटा टेलिकम्युनिकेशन (३.१९%), ज्युबिलिएंट फूडस (२.४०%), डीसीएम श्रीराम (२.२८%), हिंदुस्थान युनिलिव्हर (१.९५%), पीआय इंडस्ट्रीज (१.९२%), सिमेन्स (१.६२%),डाबर इंडिया (१.३२%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेच्या फेडने दर कपात केल्यानंतर जागतिक जोखीम घेण्याची क्षमता सुधारली, रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आणि एफआयआयचा सततचा प्रवाह असूनही, तरलता आशावाद वाढला आणि देशांतर्गत समभागांमध्ये वाढ झाली. ऑटो, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिअल्टी यांनी वाढ केली, तर एफएमसीजी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कमी कामगिरी केली. अलिकडच्या एकत्रीकरणानंतर व्यापक निर्देशांक खरेदीची आवड दाखवत आहेत, ते पुन्हा उसळी घेत आहेत. आज येणारा भारताचा नोव्हेंबरचा सीपीआय आरबीआयच्या आराम क्षेत्रात राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे धोरण स्थिरतेच्या अपेक्षांना बळकटी मिळेल. जवळच्या काळातील लक्ष हे रुपया पातळी वाढ एफआयआय प्रवाह आणि व्यापार चर्चा, बीओजे (वाढण्याची शक्यता), ईसीबी आणि बीओई धोरण यावर लक्ष असेल.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की, 'थोड्या काळासाठी कमकुवत राहिल्यानंतर निफ्टी पुन्हा २६,००० च्या वर गेला आहे. शुक्रवारी, निर्देशांक २१ ईएमए (Exponential Moving Average EMA) वर परत आला आणि पुन्हा वर आला. ४ तासांच्या चार्टवर, RSI (Relative Strength Index RSI) तेजीच्या क्रॉसओवरमध्ये आहे जो सुधारणाशील गती दर्शवितो. नजीकच्या काळात, जोपर्यंत निर्देशांक २५९०० च्यावर राहील तोपर्यंत हा ट्रेंड रचनात्मक राहण्याची शक्यता आहे, जो एक प्रमुख आधार पातळी म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. वरच्या बाजूस, निर्देशांक अल्पावधीत २६३०० च्या दिशेने जाऊ शकतो'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'बँक निफ्टीने दैनिक चार्टवर एक लहान अनिर्णीत डोजी तयार केला, जो संकोच दर्शवितो, परंतु त्याच्या वरच्या बंदसह त्याचा १०-दिवसांचा ईएमए (EMA) पुन्हा मिळवला. जर निर्देशांक पुढील २-३ सत्रांसाठी १०-दिवसांच्या ईएमएवर टिकला, तर तो पुन्हा ताकद आणि गती मिळवण्याची अपेक्षा आहे. ५९५०० च्या वरचा फॉलो-अप बंद भावनेला आणखी चालना देऊ शकतो, जरी RSI ने अद्याप तेजीच्या क्रॉसओवरची पुष्टी केलेली नाही. २०-दिवसांच्या ईएमए (EMA) जवळ आधार ५९१०० वर आहे, तर प्रतिकार (Resistance) ५९५०० आणि ५९८०० पातळीवर दिसत आहे.'

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.