पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या शुद्धीकरणाची एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे ५८.८ लाख (५८,०८,००२) मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची तयारी सुरू आहे.


निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्याचे संपूर्ण राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून, तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मतदार यादीत अनेक प्रकारच्या मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात मोठा गट मृत मतदारांचा आहे. त्यानंतर नोंदणीकृत पत्त्यावर न सापडलेले, अस्पष्ट नोंदी असलेले मतदार यांचा समावेश आहे. ही नावे आता मसुदा मतदार यादीत दिसणार नाहीत.


राजकीय वर्तुळात खळबळ


मतदार यादीतील एवढ्या मोठ्या बदलांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी याविरोधात धरणे आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र भाजपने (तृणमूल काँग्रेस) टीएमसीचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रक्रियेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून,
१६ डिसेंबर रोजी मसुदा यादी प्रसिद्ध होणार आहे.


मोहिमेची कारणे आणि आकडेवारी


निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमे'अंतर्गत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणानंतर ही नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत.




  • मृत मतदार : २४ लाखांहून अधिक.
    स्थलांतरित/अनुपस्थित : १२ लाखांहून अधिक.

  •  दुबार नोंदी : सुमारे २० लाख
    यांचा समावेश आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या