धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याने त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयासमोर काल (१५ डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश सावंत असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.


प्रकाश सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर स्वत: च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले त्यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी धाव घेत त्यांना वाचवलं.
पण, तोपर्यंत प्रकाश सावंत हे ५०-६० टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे. सावंत यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समोर आले आहे. वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून त्यांनी स्वतःला जाळून घेतले असल्याचे त्यांनी आत्मदहनाच्या आधी एका नोटमध्ये लिहिले होते.





प्रकाश सावंत यांनी आत्महत्या नोटमध्ये काय लिहले?


प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले की, कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार आणि वकील स्नेहा हरणे यांनी ५ ते ६ वेळा हक्कसोड लिहून घेतले, त्याबद्दल कित्येक तक्रारी केल्या. तरी लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर वकिल स्नेहा हरणे यांना सन २०२१ रोजी ६ लाख ८० हजार इतकी रक्कम या केससाठी दिलेली आहे, मात्र त्या सदरची रक्कम परत करत नाहीत. या विरोधात प्रकाश सावंत यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा इथे वकील स्नेहा हरणे यांच्या विरुद्ध तक्रार केली होती.


त्यावेळी जोशी नावाचे वकिल न्यायाधीश होते. त्यांनी सुद्धा वकिल स्नेहा हरणे यांना वॉर्निंग दिली होती आणि सांगितलं होतं की, प्रकाश सावंत यांचे सगळे पैसे व्याजासह द्यावे. तरी स्नेहा हरणे वकील यांनी फक्त ६ लाख इतकी रक्कम परत केली. मात्र ८० हजार ही व्याज रक्कम अजून दिलेली नाही. याबाबतची तक्रार बार कॉऊन्सील येथील रणपिसे सर यांच्याकडे १० ऑक्टोबर, २०२३ रोजीपासून आतापर्यंत ५ ते ६ वेळा केली आहे. मात्र ते सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यानंतर याबाबतची तक्रार दिल्ली मंत्रालय इथे सुद्धा ५ वेळा केल्यावर, दिल्ली मंत्रालयाने कणकवली पोलिसांना या विषयी सुचित केले. मात्र कणकवली पोलीसही याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाहीत.


राज्य सरकार आणि दिल्ली मंत्रालय येथे मी अनेक वेळा तक्रार दिली. नरडवे महमदवाडी प्रकल्पामुळे आमची जागा कणकवली सरकार यांनी घेतली आहे. जर या जागा मोबदला आम्हाला न मिळाल्यास कोणतीही अघटित घटना घडल्यास त्यास आमची कोणतीही जबाबदार नसेल.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने