भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना मिळालेल्या हा मोलाच्या आंतरराष्ट्रीय सन्मानाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणारे पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले राष्ट्रप्रमुख किंवा सरकार प्रमुख बनले आहेत. या सन्मानासह पंतप्रधान मोदींना आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून मिळालेल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची संख्या २८ वर पोहोचली आहे.


हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान
इथियोपियाकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त करत सांगितले की, “हा माझा वैयक्तिक सन्मान नसून १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो.” हा सन्मान भारत-इथियोपिया भागीदारी घडवून आणणाऱ्या असंख्य भारतीयांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





ग्लोबल साऊथमध्ये इथियोपियाची प्रेरणादायी भूमिका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जगाचे लक्ष ग्लोबल साऊथकडे लागलेले असताना, इथियोपियाची स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि आत्मगौरवाची चिरकालीन परंपरा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्य त्याच भागीदाऱ्यांचे असते, ज्या विश्वास आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असतात, असेही त्यांनी नमूद केले.


भारत-इथियोपिया सहकार्य बळकट होणार
भारत इथियोपियासोबत असलेले सहकार्य पुढे नेण्यास कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले, जे बदलत्या जागतिक आव्हानांवर उपाय देईल आणि नव्या संधींची निर्मिती करेल. विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.


इथियोपियात पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत
जॉर्डनहून पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर इथियोपियात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे राजधानी अदीस अबाबा येथे औपचारिक आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.


दोन्ही पंतप्रधानांचा एकाच गाडीतून प्रवास
मैत्रीपूर्ण वातावरणाचे दर्शन घडवत, पंतप्रधान अबी अहमद अली यांनी पंतप्रधान मोदींना हॉटेलपर्यंत स्वतःच्या गाडीतून नेले. या प्रवासादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना सायन्स म्युझियम आणि फ्रेंडशिप पार्क दाखवण्याची खास व्यवस्था केली, जी आधीच्या कार्यक्रमात समाविष्ट नव्हती.


भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अदीस अबाबामध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर भारतीय समुदायाने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. तिरंगा फडकावत ‘मोदी मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला.

Comments
Add Comment

गुजरात सीमेवर खळबळ! बीएसएफकडून 4 पाकिस्तानी मासेमार जेरबंद, सर क्रीक खाडीत चाललंय काय?

कच्छ: भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी मोठी धडक कारवाई केली आहे. गुजरातच्या कच्छ

BRICS 2026: संसद भवनात 12 वा BRICS संसदीय मंच; भारत-रशिया सहकार्यावर महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली: भारतीय संसदेच्या यजमानपदाखाली 26 ऑक्टोबर 2026 रोजी 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचाची सुरुवात होत आहे. या 2

IAF Air Show: काशीच्या आकाशात लढाऊ विमानांचा थरार! पंतप्रधान मोदींनी पाहिला ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो

वाराणसी : भारतीय वायुसेनेच्या 94 व्या वर्धापनदिनानिमित्त वाराणसीतील नमो घाटावर आयोजित करण्यात आलेल्या ‘विंग्स

Elon Musk Ukraine News: इलॉन मस्क यांचा युक्रेनवर गंभीर आरोप; म्हणाले, स्टारलिंकचा वापर लोकांना मारण्यासाठी...

वॉशिंग्टन: अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी युक्रेनवर त्यांच्या स्टारलिंक सेवेच्या अटींचे उल्लंघन केल्याचा

‘मन की बात’ला 12 वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा ड्रग्ज माफियांना इशारा! ‘तरुणाईशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही’; ड्रग्ज तस्करांविरुद्ध मोठी कारवाई?

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय सीमांचा गैरवापर करून देशाच्या युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवणाऱ्या