ठेकेदाराला हलगर्जीपणा नडला, रंगकाम करताना कोसळून मजूराचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. सहकारनगर परिसरातील एका बंगल्यात रंगकाम करत असताना उंचावरून तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मजुरांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याचा ठपका ठेवत सहकारनगर पोलिसांनी संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर थेट मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणावरून मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



नेमकी घटना काय?


पुण्याच्या सहकारनगर येथील गणेशदत्त सोसायटीमधील एका बंगल्यात सध्या नूतनीकरणाचे आणि रंगकामाचे काम सुरू आहे. यासाठी दीपक गुप्ता आणि दीनानाथ मेणक चौधरी या मजुरांना ठेकेदारांनी कामासाठी नेमले होते. दरम्यान रंगकाम करताना दोन्ही मजूरांचा तोल गेला आणि ते उंचावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत दीपक गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीनानाथ चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या प्रकरणी मुन्ना जोखुप्रसाद गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी कंत्राटदार अफसर शेख आणि क्रांतीलाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांना उंचावर काम करताना आवश्यक असणारे सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा सुरक्षित मचान पुरवण्यात आले नव्हते. मजुरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती असतानाही त्यांना काम करायला लावल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.




कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णतः ठेकेदाराची असते. या घटनेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. खाजगी बंगले किंवा इमारतींच्या कामात अनेकदा मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे अशा जीवघेण्या घटना घडतात. या घटनेमुळे कामगार वर्गात संताप व्यक्त होत असून, कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षा ऑडिट करणे किती गरजेचे आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Solapur Crime News : सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयाची हत्या; सासऱ्याने डोक्यात दगड घातल्याचा आरोप

Solapur Crime News: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना

"आरोप- प्रत्यारोप नको, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा"; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शिवसेनेच्या सर्व आमदार- मंत्र्यांना आदेश

मुंबई: एकमेकांवर सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप थांबवा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा, असे निर्देश

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या; मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे शिक्षकांना आवाहन

नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे

Chhagan Bhujbal News: मंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा घेतला आढावा, अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे आदेश

नाशिक: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेक मंत्री

कोकणवासीयांनो, सावंतवाडी- मुंबई CSMT ट्रेनच्या वेळेमध्ये बदल; कधीपासून लागू होणार नवा टाइम टेबल?

मुंबई: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सावंतवाडी रोडवरून मुंबई सीएसएमटीकडे दररोज धावणाऱ्य

Diwali Firecracker Rules : दिवाळीत फटाके फोडताना सावधान ! नियम मोडल्यास होणार कारवाई ; विक्रीच्या परवान्याबाबतही महत्त्वाचे नियम

मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीसंदर्भात पोलिस प्रशासनाकडून नियमावली जाहीर