...म्हणून टीव्ही अभिनेत्यावर झाला हल्ला, डोक्यात मारला दंडुका


मुंबई : टीव्ही अभिनेता अनुज सचदेवावर त्याच्याच सोसायटीच्या आवारात पाठीमागून येऊन डोक्यात दंडुका मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दंडुका मारुन संबंधित व्यक्ती घटनास्थळावरुन शिवीगाळ करत पळून गेली. या घटनेत टीव्ही अभिनेता अनुज सचदेवाच्या डोक्याच्या मागील भागात जखम झाली. हल्लेखोराने अनुजच्या पायावर पण दंडुका मारला. यामुळे त्याच्या एका पायाला जखम झाली आहे. जखमी झालेल्या अनुज सचदेवाने तातडीने उपचार घेतल्यामुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे.





मारहाण करणारा प्रदीप सिंग आहे. त्याने कार व्यवस्थित पार्क केली नव्हती. सोसायटीच्या आवारात 'वॉक' करत असताना कार चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याचे बघून मी मोबाईलमध्ये फोटो काढला आणि सोसायटीच्या ग्रुपमध्ये टाकला. या प्रकाराचा राग आल्यामुळेच प्रदीपने माझे लक्ष नसताना मागून येऊन डोक्याच्या मागील भागावर तसेच पायावर दंडुका मारला. प्रदीपच्या हल्ल्यात डोक्याला आणि पायाला दुखापत झाल्याचे टीव्ही अभिनेता अनुज सचदेवा म्हणाला. ही घटना घडल्यापासून त्याने सोसायटीच्या आवारात एकट्याने वावरणे थांबवले आहे. पुन्हा हल्ला होईल अशी भीती त्याच्या मनात बसली आहे. हल्लेखोराविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी टीव्ही अभिनेता अनुज सचदेवाने केली आहे. एक इन्स्टा पोस्ट करुन त्याने स्वतःची भूमिका जाहीर केली आहे.


टीव्ही अभिनेता अनुज सचदेवा गोरेगाव येथे एका सोसायटीत वास्तव्यास आहे. तो सध्या 'ये रिश्ता क्या कहलता है' या टीव्ही मालिकेत काम करत आहे. पण ताज्या घटनेमुळे तो अभिनयाऐवजी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.


Comments
Add Comment

ब्रिटिश साम्राज्याला थेट ललकारणारा ‘फौजी’! प्रभासच्या वाढदिवसावर चाहत्यांना धमाकेदार ट्रीट

मुंबई: सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘फाइल

Namdev Dhasal Biopic: कवी नामदेव ढसाळ यांचा बायोपिक रूपेरी पडद्यावर येतोय, मुख्य भूमिकेत कोण?

दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'ढसाळ' या बहुप्रतीक्षित चरित्रपटाची घोषणा काही

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील सुरत कनेक्शन समोर; मुंबई क्राइम ब्रँचने 2 बंदुका, 10 काडतुसे जप्त

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.

Jay Bhanushali emotional reaction : जय भानुशालीची भावनिक प्रतिक्रिया; घटस्फोटानंतर पोटगी नाकारणाऱ्या माही विजसाठी म्हणाला, 'पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता!'

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी असलेल्या जय भानुशाली (Jay bhanushali) आणि माही विज (Mahi Vij)  यांच्या

Udta Teer Movie: आयुष्मान-सारा यांच्या ‘उडता तीर’ची बॉक्स ऑफिसवर एन्ट्री; पहिल्या दिवशी किती कमाई?

आयुष्यमान खुराना आणि सारा अली खान यांच्या 'उडता तीर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर माफक कमाई केली. या स्पाय कॉमेडीला

Rohit Shetty Bigg Boss 20 : रोहित शेट्टीचा पारा चढला! ‘ब्लैंकेट मसाज’ प्रकरणावरून स्काउट आणि लव गिलची स्टेजवरच कानउघडणी

मुंबई : सध्या ‘बिग बॉस २०’ (Bigg Boss 20) हा शो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. घरातील स्पर्धकांची बदलती समीकरणे आणि