भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात


विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी

विशाखापट्टनम :
२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकाचे बिगुल आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. भारत आणि श्रीलंका महिला संघांमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत असून, ही मालिका केवळ विजय-पराजयासाठी नसून भविष्यातील 'स्टार्स' शोधण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.या मालिकेतून भारतीय निवड समिती भविष्यातील संघ बांधणीवर भर देत आहे. मुंबई इंडियन्सकडून डब्ल्यूपीएलमध्ये जी. कमलिनी छाप पाडल्यानंतर, ही युवा यष्टिरक्षक-फलंदाज आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या वैष्णवी शर्मा हिच्याकडे भारताची भविष्यातील हुकमी एक्का म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ देखील शशिनी गिम्हानी आणि रश्मिका सेव्वांदी सारख्या खेळाडूंना संधी देऊन भारताला कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहे.


२०२६ विश्वचषकाची तालीम इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०२६


टी-२० विश्वचषकापूर्वी खेळाडूंचा फॉर्म आणि मानसिक क्षमता तपासण्यासाठी ही मालिका निर्णायक ठरेल. भारतीय संघ व्यवस्थापन या पाच सामन्यांतून विविध जोड्या आणि रणनीतींचा प्रयोग करणार आहे.


मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक :




  • पहिला सामना: २१ डिसेंबर, विशाखापट्टनम (संध्या ७.००)

  • दुसरा सामना: २३ डिसेंबर, विशाखापट्टनम (संध्या ७.००)

  • तिसरा सामना: २६ डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)

  • चौथा सामना: २८ डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)

  • पाचवा सामना: ३० डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)


असा आहे श्रीलंकेचा महिला संघ :


चामरी अथापथ्थू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा (उपकर्णधार), हसिनी परेरा, विशमी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, इमेशा दुलानी, कौशिनी नुथ्यांगना (यष्टिरक्षक), मालशा शेहानी, इनोका रणवीरा, शशिनी गिम्हानी, निमेषा मधुशानी, काव्या कविंदी, रश्मिका सेव्वांदी, मलकी मदारा.


असा आहे भारतीय महिला संघ :


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार),शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टिरक्षक),जी. कमलिनी (यष्टिरक्षक), एन. श्री चरणी, वैष्णवी शर्मा.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून