सोन्याचांदीत 'ऐतिहासिक' वाढ! सोने १३५००० पार चांदी २२०००० जवळ का सर्वोच्च स्तरावर वाचा!

मोहित सोमण: सकाळी सोने व चांदीत विक्रमी वाढ झाली आहे. जगभरातील नव्या ट्रिगरचा लाभ सोन्याचांदीच्या दरात होत असल्याने सोन्याचांदीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम किंमत २४ कॅरेटसाठी १३५२७, २२ कॅरेटसाठी १२४००, १८ कॅरेटसाठी १०१४६ रूपयांवर पोहोचली आहे. तोळ्याबाबत दर २४ कॅरेटमागे ११०० रूपयांनी, २२ कॅरेटमागे १००० रूपयांनी, १८ कॅरेटमागे ८२० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३५२८०, २२ कॅरेटसाठी १२४०००, १८ कॅरेटसाठी १०१४६० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसी+एक्समध्ये सोन्याचा निर्देशांकात तब्बल १.१६% वाढ झाल्याने दरपातळी १३५७५१ रूपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३५२८, २२ कॅरेटसाठी १२४००, १८ कॅरेटसाठी १०१४६ रूपयांवर पोहोचले आहेत. गेल्या १० दिवसात सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ३०० रूपयाने, २२ कॅरेटसाठी २५० रुपयांनी वाढले आहेत.


संपूर्ण डिसेंबर महिन्याचा विचार केल्यास सोने ४% उसळले असून आज सोन्याने १३५००० पातळीही पार केली. तर जागतिक स्तरावर पाहिल्यास गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.१८% वाढ झाली असून जागतिक मानक असलेल्या युएस गोल्ड स्पॉट दरात १.४८% वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दर आज ४४०३.१८ औंसवर गेला आहे.


आज मोठ्या प्रमाणात सोने वाढण्याचे महत्वाचे ट्रिगर कुठले?


१) आज प्रामुख्याने डॉलर निर्देशांकातील दबाव घसरला ज्यामध्ये डॉलर निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणूक म्हणून सोन्यातील दबाव वाढला


२) भूराजकीय स्थितीत स्थिरतेकडून पुन्हा एकदा अस्थिरतेकडे वाटचाल,आशिया खंडात इस्त्राईल इराण यांच्यातील युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्यातील पुरवठ्यात दबाव वाढला.


३) युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरावर पुन्हा एकदा कपातीचे संकेत मिळाल्यावर सकारात्मक भावनेत वाढ


४) युएस आणि व्हेनेझुएला यांच्यातील संभाव्य संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूकीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली दरम्यान पुरवठा मर्यादित राहिला आहे.


५) सोने एक सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून वाढलेला गोल्ड स्पॉट व्यवहार


६) ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) झालेली वाढ


७) आरबीआयकडून वाढलेले हेजिंग


८) अस्थिरतेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून भारतीय गुंतवणूकदारांनी वाढवलेली सोन्यातील गुंतवणूक


या एकत्रित कारणांमुळे आज सोन्यात भारत व संपूर्ण आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान चीनने ही आपला व्याजदर कायम ठेवल्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात आज सोन्याच्या मागणीत आणखी वाढ झाली होती. वाढलेल्या मागणीचा परिणाम म्हणून या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या भावात ६७% वाढ झाली आहे. ज्यामुळे अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत आणि प्रति डॉलर ३००० औंसवर वाढ झाली असून आणि ४००० डॉलरचे टप्पा प्रथमच ओलांडला गेला आहे ज्यामुळे तज्ञांच्या मते १९७९ नंतरच्या सर्वात मोठ्या वार्षिक वाढीसाठी सोने सज्ज होत आहे.


चांदीच्या दरातही मोठी वाढ !


चांदीच्या दरातही आज प्रचंड वाढ झाली आहे. युएस फेड दरातील व्याजदरातील कपात वर्तवली जात आहे. तसेच वाढलेल्या औद्योगिक मागणीसह वाढलेली सिल्वर स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे चांदीला कमोडिटी म्हणून मागणीत वाढ झालेलीच आहे परंतु युएसने मौल्यवान धातूत चांदीचा समावेश वाढल्याने सोन्याहून किंबहुना अधिक पातळीवर दिवसेंदिवस चांदीचे आकर्षण व मागणी वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून युएस आणि व्हेनेझुएला अस्थिरतेचे निमित्त साधल्याने चांदीने आज ऐतिहासिक पातळी गाठली आहे.


'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ५ रूपयांनी, प्रति किलो दरात ५००० रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे प्रति ग्रॅम दर २१९ रूपयांवर व प्रति किलो दर २१९००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात १.९५% वाढ झाल्याने चांदी २१२५०० रूपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर आज २१९० रूपयांवर, प्रति किलो दर २१९००० रूपयांवर पोहोचले आहेत. तर जागतिक स्तरावरील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात २.१७% वाढ झाली आहे.


चांदीत आणखी वाढ का होत आहे?


१) चांदीच्या साठ्यांची कमतरता


२)मजबूत औद्योगिक मागणी


३) अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या यादीत समावेश यामुळे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि ती २.३९% वाढून २०८,४३९ वर स्थिरावली.


४) ईटीएफमधील मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक आणि सातत्यपूर्ण किरकोळ खरेदीमुळे याला आणखी गती ज्यामुळे आगामी वर्षांमध्ये पुरवठ्यात संरचनात्मक तूट निर्माण होण्याच्या अपेक्षांना बळकटी मिळाली आहे असे तज्ञांचे मत आहे.


५) सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा-सेंटर पायाभूत सुविधांमधील औद्योगिक वापर वाढतच आहे.


६) चांदीच्या दरात पुढे काय अपेक्षित- जागतिक खाण उत्पादन आणि इतर कार्यात चांदीचा पुनर्वापर गेल्या दशकाहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात स्थिर राहिला. परिणामी, चांदीचे बाजार सलग पाचव्या वार्षिक तुटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तज्ञांचे मत आहे की, एकूण तूट येणाऱ्या काळात ८०० दशलक्ष औंसच्या जवळ पोहोणार आहे.


एकाच आठवड्यात चांदी प्रति किलो २०००० हून अधिक पातळीवर उसळली आहे. त्यामुळेच स्पॉट चांदीच्या दरात ३% पेक्षा जास्त वाढ होऊन तो प्रति औंस ६९.४५४५ डॉलर पातळीच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला, तर चांदी फ्युचर्सने प्रति औंस ६९.५१५ डॉलरचा उच्चांक गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये अमेरिकेच्या व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता वाढल्याने भौतिक मालमत्तेच्या मागणीलाही चालना मिळाली आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला