कांतारा चॅप्टर १’ ला तगडी टक्कर देत, ‘धुरंधर’ बनला २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

रणवीर सिंग स्टार "धुरंधर" या चित्रपटाने आपली कमाई सुरूच ठेवली आहे.चित्रपटाने १७ दिवसांत ५५५ कोटींचा आकडा ओलांडला असून, आता १८ व्या दिवशी "कांतारा चॅप्टर १" ला मागे टाकले आहे.


२०२५ हे वर्ष मनोरंजन जगतासाठी चांगले ठरले आहे. "छावा " "सैयारा," आणि "कांतारा: चॅप्टर १" सारख्या चित्रपटांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर लक्षणीय फायदा मिळवला आहे आणि आता, वर्षाच्या अखेरीस, एक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला आहे जो सर्व रेकॉर्ड तोडू शकतो. आपण "धुरंधर" बद्दल बोलत आहोत, “धुरंधर” हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल असे बॉलिवूड अँक्टरर्स आहेत . आणि पहिल्या दिवशी २८ कोटी रुपये कमावले आहे. त्यानंतरही त्याची कमाई कमी झाली नाही. १७ दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले. पहिल्या आठवड्यात त्याने २०७.२५ कोटी रुपये कमावले आणि दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २५३.२५ कोटी रुपये कमावले. आता, तिसऱ्या आठवड्यात, त्याच्या कमाईच्या चार्टमध्ये थोडी चढ-उतार पाहायला मिळत आहे. १८ व्या दिवशी सर्वात कमी कमाई झाली, परंतु आता धुरंधरने “कांतारा २” ला मागे टाकले आहे.


१ ‘कांतारा चॅप्टर १’ ला धुरंधरने दिली टक्कर


२ ‘धुरंधर’ बनला २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट


३ ‘धुरंधर’ची १८ व्या दिवसाचे कलेक्शन


रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अली खान अभिनीत “धुरंधर” हा चित्रपट २८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. आदित्य धर यांच्या दुसऱ्या दिग्दर्शनातील या चित्रपटाने १७ दिवसांत भारतात ५५५ कोटी रुपये आणि जगभरात ८४७ कोटी रुपये कमावले आहेत. आता १८ व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहेत.


जाणून घेऊया ‘धुरंधर’ने १८ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?


सॅकनिकच्या मते, ‘धुरंधर’ने १८ व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या सोमवारी सुमारे १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे १७ दिवसांतील सर्वात कमी होते. एकूण आता ५७१.७५ कोटी रुपये झाले आहेत, म्हणजेच ६०० कोटी रुपये गाठण्यासाठी थोडे अधिक काम करावे लागणार आहे. २५ डिसेंबर रोजी त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु, कार्तिक आर्यनचा देखील त्यादिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या दोघांची टक्कर पाहणे मनोरंजक ठरणार आहे.


‘धुरंधर’ने ‘कांतारा: चॅप्टर १’ ला टाकले मागे


‘धुरंधर’ ने ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १’ च्या जगभरातील ८५२.३१ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. आता तो रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ ला देखील मागे टाकणार आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर जगभरात ९१५ कोटी रुपयांची कमाई केली होती. परंतु, जर आपण दोघांच्या १७ व्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, त्यात लक्षणीय फरक आहे. संदीप रेड्डीच्या चित्रपटाने १४.५ कोटी रुपये कमावले, तर आदित्य धरच्या चित्रपटाने ३८.५ कोटी रुपये कमावले. यावरून असे दिसून येत आहे की ‘अ‍ॅनिमल’ या कमाईत पुढे आहे.

Comments
Add Comment

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर