राज्यातील ३० लाख लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'कडे पाठ

३१ डिसेंबरची डेडलाईन; प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ कायमचा बंद


मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून जवळपास ३० लाख लाभार्थी बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेंतर्गत दरमहा मिळणारी
१ हजार ५०० रुपयांची मदत सुरू ठेवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, अद्याप ३० लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास योजनेचा लाभ कायमचा बंद होणार आहे.


राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. घरखर्च, आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी हा निधी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.


१ कोटी ६० लाख महिलांची ई-केवायसी पूर्ण




  •  सध्या राज्यात सुमारे २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी होत्या. यापैकी १ कोटी ६० लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असली, तरी उर्वरित ३० लाख महिलांनी अजूनही ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे शासनाने मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.





  • ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. लाभार्थी महिलांनी अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन आधार क्रमांक टाकावा, ओटीपीद्वारे प्रमाणीकरण करावे आणि आवश्यक माहिती भरावी. ही प्रक्रिया घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून पूर्ण करता येते. मात्र, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच, चुकीची माहिती भरल्यास 'वन टाइम एडिट'ची सुविधा ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे.


Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने