महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्मूला ठरला! लवकरच होणार अधिकृत घोषणा

ठाणे: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात जागा वाटपावरून ५ तास मॅरेथॉन चर्चा झाली. यावरून पुढील दोन दिवसात महायुतीकडून मोठी चर्चा होणार असल्याचा अंदाज आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी रात्री उशिरा सुरू झालेली ही बैठक पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु होती. ज्यात शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे देखील उपस्थित होते. राजकीय चर्चेपलिकडे अनेक विषयांवर हास्यविनोद करत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा पार पडली, अशी माहिती या बैठकीनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिली. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व आणि कार्यकौशल्याबद्दलही बराच वेळ या बैठकीत चर्चा झाली. ज्यात उपस्थित प्रत्येकाने मोदींसोबतचे आपले वैयक्तिक अनुभवही मांडले, असेही म्हस्के यांनी सांगितले.




ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील महापालिकांमधील युतीची घोषणा अंतिम टप्प्यात असल्याचे या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. तसेच महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार असल्याचेही या बैठकीनंतर समजते आहे. दरम्यान महायुतीचा जागा वाटपाचा मुख्य फॉर्म्युला ठरला असला तरी येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभागस्तरावरील उमेदवारांच्या नावांवर चर्चा होईल. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महायुतीच्या वतीने जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

Chhath Puja Train Rush : दिवाळी अन् छठपूजेचा माहोल! पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी; प्रशासनाकडून विशेष सुरक्षा उपाय लागू

पुणे : दिवाळीचा सण आणि पाठोपाठ येणारी छठपूजा यामुळे सध्या पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा अक्षरशः लोट लोटताना

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश! परदेशी महिलेच्या शरीरातून कोकेनच्या 11 कॅप्सुल ताब्यात

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली

Ashish Shelar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे भाजपला अमान्य, मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांसमोर ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून तिची सखोल चौकशी

IND vs NZ पहिल्या टी20 सामन्यात 225 धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने नोंदवले विक्रम, काय ते जाणून घ्या

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिला विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचे वीज बिल शून्यावर आणणार, मंत्री पंकजा मुंडे यांचा शब्द

मुंबई: सौर ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून

सात महिन्यांपासून सासवड नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना वेतनच नाही, कामगार मंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे दिले निर्देश

मुंबई: सासवड नगरपालिकेतील 230 कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा