ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय


नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) स्पष्ट केले आहे.


अरवलीच्या व्याख्येतील बदलाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने ‘चहा’ची व्याख्याही बदलली आहे. ‘चहा’ हा फक्त त्या उत्पादनासाठी वापरला जाऊ शकतो, जो कॅमेलिया सायनेन्सिस या वनस्पतीपासून बनलेला असेल. तसेच एफएसएसएआयने फूड बिझनेस ऑपरेटर्स (एफबीओएस)ला कडक इशारा दिला आहे की, कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून न बनलेल्या पेयांना-जसे की औषधी वनस्पती किंवा फुलांपासून तयार केलेले यांना चहा म्हणणे बेकायदेशीर आहे.


जर हर्बल टी किंवा ग्रीन टीला चहा म्हणून ब्रँडिंग केली गेली, तर ती भ्रामक जाहिरात आणि चुकीच्या लेबलिंगच्या अंतर्गत येईल. एफएसएसएआयने २४ डिसेंबरला जारी केलेल्या आदेशात सांगितले की, अनेक कंपन्या ‘हर्बल टी’, ‘रुईबोस टी’, ‘फ्लॉवर टी’ असे उत्पादन चहा म्हणून विकत आहेत, पण प्रत्यक्षात ही उत्पादने चहाच्या वनस्पतीपासून बनलेली नाहीत. नियमांनुसार ‘चहा’ हा शब्द फक्त कॅमेलिया सायनेन्सिसपासून बनलेल्या पेयांसाठी वापरता येईल. यात कांगडा चहा, ग्रीन टी आणि इन्स्टंट टी यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे. एफएसएसएआयने स्पष्ट केले की, हर्बल किंवा इतर वनस्पतीपासून बनलेले पेय या वनस्पतीपासून न बनल्यास त्यांना चहा म्हणणे चुकीचे आहे, तसेच प्राधिकरणाने मॅन्युफॅक्चरिंग, पॅकिंग, मार्केटिंग, आयात, विक्री आणि ई-कॉमर्ससंबंधी सर्व व्यवसायांना निर्देश दिले आहेत की अशा उत्पादनांसाठी ‘टी’ हा शब्द थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या वापरू नये. तसेच ऑनलाइन विक्रेते आणि इतर सर्व एफबीओएसवर नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले आहे. यामुळे आता हर्बल टी, डिटॉक्स टी, फ्लॉवर टी यांसारख्या ड्रिंक्सची नावे बदलावी लागणार आहेत.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी