ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा एकीचा नारा

ठाणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकीचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कडवे विरोधक बनलेले शरद पवार गट आणि अजित पवार गट आता विजयासाठी एकत्र येण्याचे संकेत देत आहेत. दोन्ही गटांनी सांगितले की, आघाडीचा प्रस्ताव आला तर वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार केला जाईल, त्यामुळे निवडणुकीत आघाडीच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाची साथ दिली आहे, तर माजी खासदार आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचा गट अजित पवार यांचा पाठिंबा करतो. एकेकाळी कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेलेले हे नेते आता फुटीनंतर कडवे विरोधक बनले, मात्र आता ऐक्याचा सूर लावला जात आहे.


ठाण्यातील राबोडी, कळवा आणि मुंब्रा भागांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवत असून, कळवा-मुंब्रा भागात बहुसंख्या जागा सोडल्या जाणार आहेत. अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे शत्रू नाहीत. ३० तारखेपर्यंत प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार करू. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणणे हे महत्त्वाचे आहे. ठाणे शहरात पक्ष वाढवायचा असेल तर आता विचार करावा.”


त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले, “अजित पवार गटही आमचा दुश्मन नाही. जर आघाडीचा प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवू. निवडणूक आधी की नंतर एकत्र येणे बघू, पण निवडणुकीपूर्वी एकत्र आले तर पक्षाची ताकद दिसेल.” सध्या या आश्वासक विधानांमुळे ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही गटांच्या आघाडीच्या शक्यतेची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी