Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा परीक्षा’ कायमची रद्द करण्यात आली आहे.



महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी (तत्कालीन मुंबई सरकार काळात) शासकीय प्रयोजनांसाठी हिंदी भाषेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सर्व शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला. सध्याच्या शासकीय कामकाजाचे स्वरूप आणि ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम’ यातील तरतुदी विचारात घेता, ही परीक्षा चालू ठेवणे संयुक्तिक ठरत नाही. राज्य सरकारच्या रोजच्या प्रशासकीय कामकाजात हिंदीच्या तुलनेत इंग्रजीचा वापर जास्त केंद्र सरकार तसेच इतर राज्यांशी होणारा पत्रव्यवहार प्रामुख्याने इंग्रजी भाषेतून केला जातो. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेत मराठी भाषेला प्राधान्य मिळावे आणि इतर परीक्षांचा ताण कर्मचाऱ्यांवर राहू नये, यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द करण्यात येत असल्याचा शासन ादेश काढण्यात आला आहे. हा शासन आदेश सोमवार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मराठी भाषा विभागाच्या कार्यासन अधिकारी वैशाली वाघमारे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ७ मे २०२६ पासून म्हणजेच पूर्वलक्ष्यी प्रभावाने केली जाणार आहे.

Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु