CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. CJPमध्ये दिसणारे चार-पाच तरुण हे केवळ मोहरे असून, त्यांच्या बैठकींमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाशी संबंधित १८० संघटना सहभागी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्या संघटनांनी भाजपविरोधात नरेटिव्ह तयार केला, त्याच संघटना आता नवीन नाव घेऊन पुन्हा भाजपविरोधात मैदानात उतरल्याची टीका फडणवीस यांनी केली. (CM Devendra Fadnavis)



मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रामायणातील ‘कालनेमी’ या संदर्भाचा दाखला देत विरोधकांवर निशाणा साधला. रामायणात कालनेमी वेगवेगळे वेष घ्यायचा. कधी साधूचा, तर कधी सामान्य माणसाचा वेष घेऊन तो राक्षसी हेतू घेऊन जायचा. मात्र प्रभू श्रीरामांचे नाव घेतल्यानंतर कालनेमी देखील जिंकू शकला नाही असे फडणवीस म्हणाले.


आम्ही केवळ रामाचे नाव घेणारे नाही, तर प्रभू श्रीरामांनी दिलेल्या तत्त्वांनुसार राज्यकारभार चालवण्याचा प्रयत्न करणारे आहोत. त्यामुळे कार्यपद्धतीतील बदल समजून घेतला पाहिजे असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण