सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज


आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा दमदार टीझर सादर केला आहे. मात्र हा केवळ वाढदिवशी दिलेला सरप्राइझ नसून, देशाच्या सीमांवर उभ्या राहून प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना अर्पण केलेला एक गंभीर आणि हृदयस्पर्शी अभिवादन आहे.


या चित्रपटात सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याचा हा अवतार आजवरच्या सर्वात प्रभावी आणि दमदार भूमिकांपैकी एक मानला जात आहे. त्याचा कणखर पण संयमी स्वभाव, नियंत्रित आक्रमकता आणि शांततेतून व्यक्त होणारी ताकद — हे सर्व त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देते. विशेषतः टीझरच्या शेवटच्या क्षणी त्याची निर्धारपूर्ण नजर प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवते.


टीझरमध्ये हिमालयातील कठोर आणि निर्दयी भूभाग, तसेच उंच पर्वतीय सीमांवरील युद्धाची कठोर वास्तविकता अत्यंत प्रभावी पद्धतीने दाखवली आहे.
टीझरला स्टेबिन बेन यांच्या भावस्पर्शी आवाजाची साथ लाभते, ज्यामुळे दृश्यांमधील भावनिक तीव्रता अधिकच वाढते. त्यासोबत हिमेश रेशमिया यांनी दिलेला दमदार पार्श्वसंगीताचा ठेका, या दृश्यांना आणखी प्रभावी आणि हृदयाला भिडणारा बनवतो.


‘बॅटल ऑफ गलवान’ हा फक्त युद्धपट नाही — तो संघर्षाची खरी किंमत, सीमांवर लढणाऱ्या सैनिकांचे अदम्य साहस आणि हे शाश्वत सत्य दाखवतो की, शौर्य जरी अमर असले तरी खरा विजय नेहमी शांततेचाच असतो.


अपुर्व लखिया दिग्दर्शित हा चित्रपट शौर्य, त्याग आणि जिद्दीचे थरारक आणि निःसंग चित्रण करतो. या चित्रपटात चित्रांगदा सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट सलमा खान यांच्या ‘सलमान खान फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मित होत आहे




Comments
Add Comment

Kartik Sabesh Death: आधी काका, नंतर पुतण्या, प्रसिद्ध तामिळ अभिनेत्याचं 37 व्या वर्षी निधन; कुटुंबीयांवर कोसळला दुहेरी दु:खाचा डोंगर

मुंबई: तामिळ इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेता कार्तिक सबेश याचे सोमवारी रात्री उशिरा निधन झासे आहे.

Deepika-Ranveer: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने जाहीर केलं दुसऱ्या मुलीचं नाव; ‘देवी’च्या फोटोने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. या

Tiger Shroff Shooting Case: टायगर श्रॉफवरील गोळीबारात वापरलेली बाईक पोलिसांच्या रडारवर; मालकाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी फुटबॉल मैदानावर बाहेर पडत

Tiger Shroff Car Attack : थरारक हल्ल्यानंतर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया ! डावीकडून 3 तर समोरून 2 गोळ्या पुढे...

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं मनोरंजनविश्वात खळबळ उडाली होती.

Jailer 2 Box Office Collection : रजनीकांतच्या ‘जेलर 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, पाचव्या दिवशी कमावले इतके कोटी

Jailer 2 Box Office Collection  : सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड सुरू आहे. पहिल्या

Surya Teaser: सनी पाजीच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'सूर्या'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

मुंबई: सनी पाजीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सनी देओल यांच्या आगामी ‘सूर्या’ या