कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात. त्यामुळे या परिसरात १ जानेवारीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि नगर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियमावली जारी केली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतुकीतील हे बदल बुधवारी दुपारी २ वाजल्यापासून १ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.


पर्यायी मार्गाचे नियोजन

पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहतूक: पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपासवरून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रोड, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूर मार्गे पुढे जावे.


मुंबईकडून नगरकडे जाणारी वाहतूक: मुंबईहून येणाऱ्या वाहनांनी वडगाव-मावळ-चाकण-खेड-मंचर-नारायणगाव-आळेफाटा या मार्गाचा अवलंब करावा. तर हलकी वाहने पाबळ-शिरूर मार्गे जाऊ शकतात.


कोल्हापूर, सांगली, सातारा बाजूकडून नगरकडे: या भागातून येणारी वाहने मांतरवाडी फाटा, हडपसर आणि केडगाव चौफुला मार्गे शिरूरकडे वळवण्यात येणार आहे.


सोलापूर रोडकडून आळंदी-चाकणकडे: सोलापूर रोडने येणाऱ्या वाहनांनी हडपसर-मगरपट्टा चौक-खराडी बायपास आणि विश्रांतवाडी मार्गे पुढे जावे.




जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी थेऊर फाटा, हॅरिस ब्रिज, बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, नवले ब्रिज, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक आणि मरकळ ब्रिज या ठिकाणांहून जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तसेच आळंदी-तुळापूर पूल जड वाहनांसाठी बंद असून तिथून फक्त हलकी वाहने सोडली जातील.


पार्किंगची व्यवस्था
प्रशासनाने अनुयायी आणि पर्यटकांसाठी लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे गाव आणि थेऊर रोड या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची सोय केली आहे. मुख्य ठिकाणांवर माहिती फलक लावण्यात आले असून वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Manmad Junction : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-शिर्डी वंदे भारतला मनमाडमध्ये अधिकृत थांबा

Railway News: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाड

कर वाचवण्यासाठी परराज्यात वाहन नोंदणी? महाराष्ट्रात ४७५ वाहनांवर कारवाई!

राज्यात वापरली जाणारी परंतु कर चुकवण्यासाठी महाराष्ट्राबाहेर नोंदणी केलेली वाहने उघडकीस आणण्याच्या

Satara : कराडजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण दुर्घटना, चार मित्रांचा करुण अंत

सातारा : कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला.

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उकाडा वाढणार, गुलाबी थंडीसाठी आणखी प्रतीक्षा; कोकणासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

बिस्किटाचा पुडा तरी घेऊन जाता का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर बोचरी टीका

मुंबईत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाचं राजकारण करणाऱ्या विरोधकांना खडे बोल

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी, चिंता करू नका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द

राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी