बिस्किटाचा पुडा तरी घेऊन जाता का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर बोचरी टीका

मुंबईत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी दुष्काळाचं राजकारण करणाऱ्या विरोधकांवर तोंडसुख घेतलं. तसेच आरोप करणाऱ्या विरोधकांना आपल्या शैलीत मिश्किल टोलाही लगावला.

मुंबईत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाचं राजकारण करणाऱ्या विरोधकांना खडे बोल सुनावले. मुंबईतील दसऱ्या मेळाव्यात त्यांनी आरोप करणाऱ्यांवर तोंडसुख घेतलं. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठं मन लागतं असंही सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'रोज तुम्ही आम्हाला शिव्या देता. रोज आरोप करता. तुमचा एकही दिवस एकनाथ शिंदेला शिव्या दिल्याशिवाय जात नाही. पण मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही आम्हाला शिव्या द्या. पण आम्ही शेतकऱ्यांना शिधा देण्याचं काम सुरू केलं आहे. तुम्ही शिव्या द्या, आरोप करा, पण आम्ही त्या आरोपांना आरोपाने उत्तर देणार नाही. आम्ही कामातून देणार..' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, 'कुठल्या तोंडाने तुम्ही आमच्यावर आरोप करतात. ट्रकच्या ट्रक भरून पाठवायला हिंमत लागते, मोठं मन लागतं. तुम्ही आमच्यावर टीका करता. बिस्किटचा पुडा तरी घेऊन जाता का? तेवढा तरी घेऊन जा.'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी'


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मी दिल्लीला गेला आणि पंतप्रधान मोदींना भेटलो. त्यांनी दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत माहिती घेतली. अमित शाह यांनीही माहिती घेतली. पंतप्रधान मला म्हणाले की, शिंदेजी चिंता करू नका. आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभे आहोत. अमित शाह देखील म्हणाले की चिंता करू नका. शेतकऱ्यांसोबत राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहेत. शेतकरी संकटात आहे आणि त्या संकटाचं तुम्ही राजकारण करता. कुठे फेडणार हे पाप. शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळता. हे शेतकरी प्रेम आहे.'


'वोट चोरीचं फेक नरेटिव्ह पसरवत आहात'


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावत म्हणाले की, 'शेतकऱ्यांची उभी पिकं करपत असताना मुंबईत मोर्चे काढत आहात. वोट चोरीचं फेक नरेटिव्ह पसरवत आहात. आम्ही शेतकऱ्यांना काय दिलं आहे ते एकदा बघा आणि तुम्ही काय दिलं ते बघा.. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही तुमची स्थिती सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. '
Comments
Add Comment

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी, चिंता करू नका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द

राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी

Nashik Crime: चांदवडमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 95 हजारांचा गांजा जप्त, दोन आरोपी जेरबंद

नाशिक: नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने गांजा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल

Pankaja Munde : भगवानगडावर पंकजा मुंडेंचा हुंकार ! शेरोशायरीतून जातीय भेदभावावर प्रहार ; दसरा मेळाव्यात नेमकं काय म्हणाल्या ?

 बीड : “जय भगवान, छत्रपती शिवाजी महाराज की जय,” अशा जयघोषाने मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’; दुष्काळग्रस्तांसाठी ठाण्यातून मदतीचे शेकडो ट्रक रवाना ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत साहित्याला दाखवला भगवा झेंडा

ठाणे : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेच्या माध्यमातून

RSS Vijayadashami 2026: सामाजिक एकता, व्यसनमुक्ती ते AI पर्यंत, मोहन भागवत दसरा मेळाव्यात काय काय म्हणाले ?

RSS Vijayadashami Utsav 2026 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव आणि

Dhamma Chakra Pravartan Din 2026 : मध्य रेल्वेची जय्यत तयारी; नागपूर व अजनी स्थानकांवर अडीच लाख प्रवाशांच्या आगमनाची अपेक्षा

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरला भेट देणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ