हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरण; अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ फरार

मुंबई : बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचं नाव काही वर्षांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलं होतं. आता या प्रकरणाचं गांभीर्य पुन्हा वाढताना दिसत असून रकुलचा सख्खा भाऊ अमन प्रीत सिंह ड्रग्ज प्रकरणात अडकल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या अमन प्रीत सिंहचा कसून शोध घेत आहेत.


हैदराबादमधील मसाब टँक परिसरात उघडकीस आलेल्या एका हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेटच्या तपासात अमन प्रीत सिंहचं नाव आरोपी म्हणून पुढे आलं आहे. प्रकरण बाहेर येताच तो फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं सक्रिय झाली आहेत.


हैदराबाद पोलिसांच्या ईगल फोर्सने १९ डिसेंबर रोजी मसाब टँक येथील चाचा नेहरू पार्कजवळ संशयास्पद कारवर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी ४३.७ ग्रॅम कोकेन आणि ११.५ ग्रॅम एमडीएमए हा अंमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी नितीन सिंघानिया आणि श्रणिक सिंघवी या दोन व्यावसायिकांना अटक करण्यात आली होती.


अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून. आरोपी नायजेरियन ड्रग्ज तस्करांकडून अंमली पदार्थ मागवून शहरातील उच्चभ्रू आणि श्रीमंत ग्राहकांना पुरवठा करत असल्याचे त्यांनी कबूल केले. या ग्राहकांच्या यादीत अमन प्रीत सिंहचं नाव ठळकपणे समोर आलं असून तो या तस्करांकडून नियमितपणे ड्रग्ज खरेदी करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.



अमन प्रीत सिंह कोण आहे?


अमन प्रीत सिंह हा अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा लहान भाऊ आहे. त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. अमनचा जन्म १ एप्रिल १९९३ रोजी झाला असून त्याचे वडील निवृत्त कर्नल आहेत. तो रकुल प्रीत सिंहसोबत ‘स्टारिंग यू’ या टॅलेंट हंट प्लॅटफॉर्मसाठी काम करत होता. याआधी २०२४ मध्ये सायबराबाद पोलिसांनी त्याला एका ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याच्या रक्त तपासणीत ड्रग्जचे अंश आढळल्याची माहिती समोर आली होती.



पोलिसांची पुढील कारवाई


हैदराबाद पोलिसांच्या माहितीनुसार, अमन प्रीत सिंह सध्या पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याला अटक करण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली असून शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणात अमन प्रीत सिंहविरोधात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण