स्नेहल जाधवांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज असल्याची माहिती आहे. स्नेहल जाधव या आपल्या कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता असून त्या शिंदेंच्या शिवसेनेत सामील होतील असे समजते.

आपल्या राजकीय कारकिर्दीत स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७ तसेच १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग चार वेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकूनही मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क ठेवत विकासकामांचा पाठपुरावा करणाऱ्या स्नेहल जाधव यांना पक्षाकडून अपेक्षित सन्मान व न्याय न मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या राजीनाम्यामुळे वॉर्ड क्रमांक १९२ सह मुंबईच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची