शेअर बाजारात 'तेजी' अधोरेखित मात्र तरीही घरसणीसह अस्थिरता 'या' कारणामुळे? सेन्सेक्स ९२ व निफ्टी ३६ अंकाने उसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स ९२ व निफ्टी ३६ अंकाने उसळला आहे. दोन्ही बँक निर्देशांकातही वाढ झाल्याचे दिसत असले तरी टेक्निकल पाहता सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टी किरकोळ घसरणीचे अथवा सपाट (Flat) बाजाराचे संकेत मिळत होते. जागतिक स्तरावरील भूराजकीय अस्थिरतेचा फटका आजही बसण्याची शक्यता असल्याने ख्रिसमस रॅलीचा इफेक्ट अखेरच्या सत्रात सत्रात कायम राहिल का हे प्रश्नचिन्ह असले तरी इस्त्राईल इराण यांच्यातील युद्ध, अमेरिकेकडून रशिया युक्रेन यांच्यातील तोडगा काढण्यासाठी सुरु झालेला प्रयत्न व कमोडिटी बाजारातील अस्थिरता व परदेशी गुंतवणूकदारांची विक्री या एकत्रित कारणांचा परिणाम शेअर बाजारात आज जाणवू शकतो. दरम्यान बाजारातील गेल्या तीन सत्रातील घसरलेला बँक निफ्टी आज तेजीत येतो का यावर सपोर्ट लेवलची गणिते अवलंबून असतील. दुसरीकडे आज दिवसभरात प्रसिद्ध होणार असलेल्या औद्योगिक उत्पादन आकडेवारीकडेही गुंतवणूकदारांचे ल‌क्ष लागले आहे. दरम्यान बँक,आयटी, मेटल शेअर्समध्ये होत असलेल्या वाढीमुळे बाजाराला आधार मिळण्याची दाट शक्यता आहे. बाजार घसरल्यास बाय ऑन डिप्स रणनीती गुंतवणूकदार कायम ठेवतील का यावरही बाजाराचे लक्ष केंद्रित असणार आहे.


सुरूवातीच्या कलात आयटी, बँक, मेटल, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये वाढ झाली असून घसरण हेल्थकेअर, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, पीएसयु बँक निर्देशांकात दिसत आहे. आशियाई बाजारातही बहुतांश निर्देशांकात तेजी दिसत आहे. प्रामुख्याने काल युएस बाजारातही अखेर रॅलीने न होता डाऊ जोन्स (०.१४%) वगळता एस अँड पी ५००, नासडाक कंपोझिट निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज अस्थिरता अपेक्षित असून सोने चांदी व ईटीएफ गुंतवणूकीतही आज अस्थिरता अपेक्षित आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (८.०८%), हिंदुस्थान कॉपर (५.९६%), एचबीएल इंजिनिअरिंग (४.७५%), एचईजी (४.३०%), सेल (३.८५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण असाही इंडिया (३.०१%), नुवामा वेल्थ (२.७५%), एम अँड एम फिनसर्व्ह (२.३५%), रेडिको खैतान (१.७३%), सिटी युनियन बँक (१.६२%), क्राफ्ट्समन ऑटो (१.३८%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान