अखेर ठरलं! झेप्टोचा ११००० कोटीचा आयपीओ येणार !

मुंबई: विविध रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे झेप्टो (Zepto) या लोकप्रिय क्विक कॉमर्स व्यासपीठ ११००० कोटीचा आयपीओ बाजारात दाखल करत असल्याचे खात्रीलायक माहिती मिळत आहे. कंपनीने २६ डिसेंबरला सेबीकडे डीएचआरपी (Draft Red Hearing Prospectus DHRP) दाखल केला होता. कंपनीचा शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार असून अद्याप प्राईज बँड आयपीओसाठी निश्चित करण्यात आलेला नाही.पब्लिक इशूसाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक माहिती गुप्त मार्गाने (Confidential Filling) सेबीकडे झाला करण्यात आली. सध्या कंपनीचे बाजार मूल्य ७ अब्ज डॉलर्सवर असून ते आयपीओनंतर आणखी वाढणार आहे.


जुलै २०२१ मध्ये कंपनीची स्थापना झाली होती. त्यावेळी क्विक कॉमर्स संकल्पना बाजारात नवीन आली होती. सुरूवातीच्या काळात कंपनीने महत्वाच्या शहरात डार्क स्टोअर्सची स्थापना केली होती. सध्या भारतातील मोठ्या शहरात २५० पेक्षा अधिक डार्क स्टोअर्स असल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही कंपनीने स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात निधी उभारणी केली होती. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये कंपनीने फंडिंग राऊंडमार्फत ४५० दशलक्ष डॉलर्स (३७५०.४० कोटींची) निधी उभारणी केली होती.


आदित पालिचा, कैवल्य वोरा यांनी मिळून कंपनीची मुहूर्तमेढ रोवली होती. सध्या संपूर्ण भारतात २५० डार्क स्टोअर्स व्यतिरिक्त ९०० पेक्षा डार्क स्टोअर्स उभारली गेली आहेत. सध्या कंपनीचे एकूण मूल्य १६००० कोटी रूपये आहे. कंपनीने आतापर्यंत ब्लिंकीट, स्विगी मार्ट व इतर अशा दिग्गज कंपन्याना टक्कर दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय मार्ग निवडल्यामुळे झेप्टो सार्वजनिक अर्ज करण्यापूर्वी सेबीसोबत आपल्या मसुदा ऑफर दस्तऐवजावर अर्ज दाखल करू शकणार असून सध्याच्या बाजारातील अस्थिरतेचा परिस्थितीनुसार आपल्या योजनांमध्ये सुधारणा करू शकेल असे कंपनीने म्हटले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Nitesh Rane: जिहादी मानसिकतेला बळ देऊ नका’!

मुंबई : ‘हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या आणि जिहादी मानसिकता बाळगणाऱ्यांना बळ देऊ नये,’ अशी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने