आश्चर्यकारक! एकदिवसीय सामन्याची तिकीटं आठ मिनिटांत फूल, विराट अन् रोहितची क्रेझ

मुंबई: भारतातील क्रिकेट विश्व सध्या चर्चेत आहे. केवळ पुरुष नाही तर भारतीय महिला संघाचेसुद्धा सर्वत्र कौतुक सुरू आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका जानेवारीपासून होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला बडोद्यामध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातून रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळण्यास सज्ज झाले आहेत. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत दोघांनी आपला फॉर्म काय आहे तो दाखवून दिल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा पुरावा म्हणजे ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तिकीट खिडकी खुली झाली आणि अवघ्या 8 मिनिटात तिकीटं विकली गेली.


तिकीट विक्रीच्या या वेगामुळे रोहीत आणि विराटची फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमधील क्रेझ दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्या क्रिकेट करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. तसेच त्यांच्यासाठी हे वर्ष खूपच महत्त्वाचे आहे. कारण पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी या दोघांना या वर्षात खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण या दोघांना वनडे वर्ल्डकप २०२७ मध्ये खेळण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी फॉर्मही तितकाच महत्त्वाचा आहे.


विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी२० आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतली आहे. पण आता ते फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे. त्यांच्या फलंदाजीची धार अजूनही कायम आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांनी क्रीडाप्रेमींचे चांगलेच मनोरंजन केले. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही तशीच अपेक्षा आहे. विराट कोहलीने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दोन सामन्यात शतक आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तर रोहित शर्माची बॅटही चांगलीच तळपली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही या दोघांच्या फलंदाजीची जादू दिसली होती.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका ११ जानेवारीपासून होत आहे. या मालिकेतील पहिला सामना बडोद्याच्या बीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. तर दुसरा सामना १४ जानेवारीला राजकोटमध्ये आणि तिसरा सामना इंदूरमध्ये होलकर मैदानात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोण खेळाडू असणार याची घोषणा २ किंवा ३ जानेवारी होणार आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून