आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली


परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याने ते फेटाळून लावले आहेत.


धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा शर्मा यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने करुणा शर्मा यांनी दाखल केलेली फिर्याद फेटाळून लावली आहे. धनंजय मुंडे यांच्यावतीने ॲड. अशोक कवडे यांच्यासह ॲड. हरिभाऊ गुट्टे यांनी काम पाहिले.


दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने आणखी एक निकाल दिला आहे. याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदी वरून निरनिराळे आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये देखील कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ते प्रकरण देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत तक्रारदाराला उलट दंड लावला होता.


नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीत एकहाती सत्ता कायम राखली, तेव्हा देखील न्यायालयाच्या निकालात आणि जनतेच्या निकालात आपला विजय झाल्याची भावनिक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती. एका पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्या विरोधातील प्रकरणांचे निकाल पाहता, या याचिका, खटले किंवा ट्रायल या निव्वळ धनंजय मुंडेंच्या बदनामीसाठी रचण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने