'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत!


नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी अलीकडेच अमेरिकन निर्यातदारांशी गॅस पुरवठ्यासाठी वार्षिक करार केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत गॅसच्या किमती आणि सबसिडी 'सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राईस'नुसार ठरवल्या जात होत्या. मात्र, आता यामध्ये अमेरिकन बेंचमार्क दरांचाही समावेश होऊ शकतो.


भारत आपल्या गरजेच्या ६० टक्क्यांहून अधिक एलपीजी आयात करतो. आतापर्यंत पश्चिम आशियातून (खाडी देश) येणाऱ्या गॅसचे दर हे 'सँडर्ड' मानले जात होते. मात्र, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी २०२६ या वर्षासाठी अमेरिकेकडून वार्षिक २.२ दशलक्ष मेट्रिक टन एलपीजी आयात करण्याचा करार केला आहे. हा भारताच्या एकूण आयातीचा १० टक्के हिस्सा आहे.


सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होईल?


जर सरकारने सबसिडीची मोजणी अमेरिकन दरांशी जोडली, तर तेल कंपन्यांवरील आर्थिक बोजा कमी होईल. मात्र, वाहतूक खर्च प्रचंड वाढल्यास भविष्यात गॅसच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळू शकतात. पहिल्यांदाच भारताने अमेरिकेसोबत 'स्पॉट मार्केट' ऐवजी 'टर्म कॉन्ट्रॅक्ट' (निश्चित मुदतीचा करार) केल्याने पुरवठ्याची सुरक्षा वाढणार.


सध्याचे दर आणि सबसिडीचे स्वरूप


सरकार एलपीजीचे विक्री दर निश्चित करते आणि कंपन्यांना होणारा तोटा सबसिडीच्या रूपाने भरून काढते. नव्या फॉर्म्युल्याचा परिणाम या भरपाईवर होऊ शकतो.


घरगुती सिलेंडर (१४.२ किलो) : दिल्लीत सध्याची किंमत ८५३ रुपये आहे.


उज्ज्वला योजना : या लाभार्थ्यांना ३०० रुपयांची सबसिडी मिळते.


कमर्शियल सिलेंडर (१९ किलो) : दिल्लीत दर १५८०.५० रुपये आहे (१ मे २०२५ पासून बदलण्याची शक्यता).


जागतिक स्थिती : सध्या कच्च्या तेलाचे दर ६२ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास स्थिर आहेत.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी