वर्षाची सुरुवात शेअर बाजारात वाढीनेच सेन्सेक्स १५७.९० व निफ्टी ४२.३५ अंकांने उसळला

मोहित सोमण: वर्षांचा पहिला दिवसही तेजीतच दिसत आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १५७.९० व निफ्टी ४२.३५ अंकांने उसळला आहे. आज पहाटे गिफ्ट निफ्टीत सकारात्मक सुरुवातीनंतरच याचे संकेत मिळाले होते. दरम्यान सत्र सुरूवातीला आज संमिश्र प्रतिसाद नसला तरी बाजारात सुरूवातीला संदिग्धता कायम राहाण्याचीही शक्यता आहे. एकीकडे सोने चांदी कच्चे तेल यांचे निर्देशांक नियंत्रित झाले असतानाही भारतीय बाजारात नव्या तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर व जागतिक स्तरावर युएस पतधोरण समितीत व्याजदरात कपातीवरून मतभेद झाल्याने युएस व आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद दिसत असल्याने आजही अखेरच्या सत्रात काय होइल हे दुपारीच स्पष्ट होईल. दरम्यान, अमेरिका भारत यांच्यातील द्विपक्षीय करार व युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाद, व रशिया युक्रेन यांच्यातील घडामोडी, डॉलर रूपया दर याची कामगिरी बाजारात परिणामकारक ठरणार आहे. काल चीनच्या बाजारातही औद्योगिक उत्पादन वाढ झाली असतानाही गुंतवणूकदारांनी पडता कौल शांघाई कंपोझिट निर्देशांकात दिला. जे आजही वातावरण कायम आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीला बँक निर्देशांकातही ठीकठाक वाढ झाल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे.


दुसरीकडे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ आज मिडिया,ऑटो, मेटल, तेल व गॅस व मेटल निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण एफएमसीजी, हेल्थकेअर, फार्मा निर्देशांकात झाली आहे. सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक १.८२% पातळीवर असल्याने बाजारात फारसा धोका जाणवत नाही. आशियाई बाजारातही सुरुवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी, जकार्ता कंपोझिट, शांघाई कंपोझिट बाजारात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण हेंगसेंग, स्ट्रेट टाईम्स, निकेयी २२५ निर्देशांकात झाली आहे. युरोपियन बाजारात आजही तेजी कायम आहे.


शेअर बाजारातील सुरूवातीच्या कलात ब्लू डार्ट एक्स्प्रेस (९.०४%), टीआरआयएल (७.६२%), वी गार्ड इंडस्ट्रीज (५.०९%), वोडाफोन आयडिया (३.०९%), एचएफसीएल (३.०७%), चोला फायनांशियल सर्विसेस (२.७९%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण गॉडफ्रे फिलिप्स (७.७६%), आयटीसी (४.२२%), एमएमटीसी (१.८९%), नाटको फार्मा (१.७८%), जेएम फायनांशियल (१.४२%), सम्मान कॅपिटल (१.२६%), नुवामा वेल्थ (१.२२%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण