दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात कामाच्या तासांवरून आणि व्यावसायिक अटींवरून झालेल्या मतभेदांमुळे हा सिनेमा आधीच वादात सापडला होता. संदीप रेड्डी वांगांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनंतर हा वाद अधिकच चिघळला आणि अखेर दीपिकाने चित्रपटातून माघार घेतल्याचं स्पष्ट झालं.


या प्रकरणावर बॉलिवूडमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक कलाकार, निर्माते आणि ज्येष्ठ मंडळींनी यावर आपापली मतं मांडली. काही दिवसांनी दीपिकाच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरीची या सिनेमात एन्ट्री झाल्याचं जाहीर करण्यात आलं. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृप्तीच्या सहभागामुळे ‘स्पिरिट’बाबतचं कुतूहल आणखी वाढलं.


नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘स्पिरिट’चं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरमध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरी दिसत असून, दोघांचेही चेहरे पूर्णपणे समोर न आणता चित्रपटाचा गंभीर आणि गडद विषय सूचित करण्यात आला आहे. लांब केस आणि तगडा फिटनेस यामुळे प्रभासचा नवा लूकही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.


‘अॅनिमल’ या सुपरहिट चित्रपटानंतर संदीप रेड्डी वांगा पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीचा विषय घेऊन येत असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘स्पिरिट’मध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरीसोबत विवेक ओबेरॉय, प्रकाश राज आणि ज्येष्ठ अभिनेत्री कंचना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


दरम्यान, दीपिका पादुकोण आणि संदीप रेड्डी वांगा यांच्यातील वादाबाबत आजही तर्कवितर्क सुरू आहेत. दीपिका या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होती. मात्र, कामाचे तास मर्यादित ठेवण्याची अट आणि मानधनात वाढ करण्याच्या मागणीमुळे मतभेद निर्माण झाल्याचं बोललं जातं. या अटी वांगांना मान्य नसल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय, संदीप रेड्डी वांगांनी नाव न घेता सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये संबंधित अभिनेत्रीच्या पीआर टीमवर टीका करत चित्रपटाची स्क्रिप्ट लीक झाल्याचा आरोपही केला होता. या संपूर्ण वादावर दीपिकाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Comments
Add Comment

Obsession Movie: एक इच्छा आणि आयुष्याला अनपेक्षित वळण! काय आहे व्हायरल One Wish Willow?

चित्रपटात जर हॉरर सीन्स असतील तर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढते. त्या भूकिमिकेबद्दल कुतूहल निर्माण होते.

Koffee With Karan 9: रश्मिका विजयच्या पाठी लग्नासाठी हात धुवून लागलेली, स्वत: अभिनेत्रीनेच केला शॉकिंग खुलासा

मुंबई: करण जोहरचा सुप्रसिद्ध चॅट शो, 'कॉफी विथ करण' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या ह्या शोचा नऊवा सीझन सुरू आहे.

‘रणबाली’ची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवशी किती कमाई?

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा 'रणबाली' या चित्रपटाच्या देशांतर्गत कमाईत

OTT वर नव्या रोमँटिक कॉमेडीचा धुमाकूळ! 6 भागांची सिरीज टॉप 10 मध्ये

दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही ना काही नवीन प्रदर्शित होत असतं. रोमँटिक सिनेमा किंवा सिरीज हे

Neeti Mohan: प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नीती मोहनवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं छत्र हरपलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नीती मोहनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गायिका नीती मोहन, कॉरियोग्राफर शक्ती मोहन

Raj Babbar: ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर दिवंगत पत्नीच्या आठवणीत भावूक; म्हणाले, "...तिची प्रचंड आठवण येतेय"

मुंबई: दिवंगत प्रसिद्ध मराठमोळी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांची काल 71 वी जयंती होती. स्मिता पाटील आज