Tamilnadu Shocker : भयंकर! घराला बाहेरून कडी लावून जोडप्याला जिवंत जाळले अन्... तिरुवनंतपुरममधील धक्कादायक घटना

तिरुवनंतपुरम : तामिळनाडूतील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातून एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. चेंगगम जवळील पाकिरिपालयम गावात अज्ञात व्यक्तींनी एका झोपडीला बाहेरून कुलूप लावून आग लावून दिली. या भीषण आगीत ५३ वर्षीय शेतकरी आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा जागीच जळून कोळसा झाला आहे.



नेमकी घटना काय?


शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पी. शक्तिवेल (वय ५३) आणि एस. अमृतम (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. शक्तिवेल हा शेतकरी असून तो गेल्या तीन वर्षांपासून अमृतमसोबत एका शेतात बांधलेल्या लहान झोपडीत राहत होता. पहाटेच्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांना जळण्याचा उग्र वास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले, मात्र तोपर्यंत झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली होती.



पाचवीला पुजलेले कौटुंबिक वाद


पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शक्तिवेल हा आपल्या पत्नीपासून तीन वर्षांपूर्वी विभक्त झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले सध्या बंगळुरूमध्ये राहतात. दुसरीकडे, अमृतम ही देखील आपल्या पतीपासून विभक्त झाली होती आणि तिलाही तीन मुले आहेत. हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून 'लिव्ह-इन' मध्ये राहत होते. गुरुवारी रात्री शक्तिवेलची मुलगी त्याला भेटायला आली होती आणि जेवण करून रात्री ९ वाजता निघून गेली होती. त्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली.



पोलिसांचा तपास आणि संशय


चेंगगम पोलीस निरीक्षक एम. सेल्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घातपाताचा प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. झोपडीला बाहेरून कडी लावण्यात आली होती, जेणेकरून कोणालाही बाहेर पडता येऊ नये. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी दोन्ही मृतांच्या माजी पती-पत्नीच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

Kolkata Stampede: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; 19 जणांचा मृत्यू, 25 जखमी

कोलकत्ता :  पश्चिम बंगालमधील उत्तर कोलकाता येथील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात शनिवारी रात्री

सिद्धु मुसेवालाच्या छोट्या भावामुळे आई- वडिलांविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या

Supreme Court Decision On Internet : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : लहान मुलांसाठीही 'इंटरनेट' हा मूलभूत हक्क; वापरावर पूर्ण बंदी घालण्यास ठाम नकार

नवी दिल्ली : लहान मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) एक अत्यंत महत्त्वाचा आणि

Greater Noida Case: आधीच रचला होता कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचा कट ? ग्रेटर नोएडा प्रकरणातील गुढ वाढलं

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये आज सकाळी मन हेलावून टाकणारी घटना घडलीये. या घटनेमुळे फक्त

काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! दिल्ली- मुंबई एक्सप्रेस- वेवर मिनीबस नाल्यात कोसळून 8 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

जयपूर: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात शनिवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण रस्ता अपघात घडला. या भीषण

CJI Surya Kant Advice to Young Lawyers : केवळ कायदेतज्ज्ञ बनू नका, तर समाजाचे 'संदेशवाहक' व्हा; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे युवा वकिलांना आवाहन

बंगळुरू : कायद्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारे भावी वकील केवळ पुस्तकी ज्ञानावर मोठे होत नाहीत, तर त्यांच्याकडे