US attack on Venezuela : हातात बेड्या, डोळ्यावर पट्टी बांधून राष्ट्राध्यक्षाला आणलं उचलून, ट्रम्प यांच्याकडून Photo जारी

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर, आता ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. ज्यात मादुरो यांच्या हातात हातकडी आणि डोळ्यावर पट्टी बांधल्याचं दिसत आहे.


बेडरुममधून ओढत केली अटक


मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन 'डेल्टा फोर्स'ने एका गुप्त मोहिमेअंतर्गत मादुरो यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. ज्यावेळी ही कारवाई झाली, तेव्हा मादुरो त्यांच्या बेडरुममध्ये झोपलेले होते. अमेरिकन सैन्याने त्यांना तिथून ओढत बाहेर काढले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकन युद्धनौका 'USS Iwo Jima' वर ठेवण्यात आले असून त्यांना तिथून थेट न्यूयॉर्कला नेण्यात आले आहे. मादुरो यांना घेऊन अमेरिकन सैन्यदल न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहे.


"मी त्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते" - ट्रम्प


डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, "मी आठवड्याभरापूर्वी मादुरो यांच्याशी स्वतः संवाद साधला होता. मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की तुम्हाला सरेंडर करावं लागेल. पण त्यांनी ऐकले नाही, अखेर आम्हाला ही कारवाई करावी लागली." तर दुसरीकडे, व्हेनेझुएलातील अनेक नेत्यांनी अमेरिकेच्या कारवाईचा निषेध केल्याचे वृत्त आहे. व्हेनेझुएलातील अनेक नेत्यांनी अमेरिकेच्या कृतीला 'थेट आक्रमण' असे संबोधले आहे. व्हेनेझुएलाने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. अमेरिका अनेक दिवसांपासून मादुरो सरकारवर ड्रग्ज तस्करीचे आरोप करत होती. अखेर ३ जानेवारी रोजी कॅराकस येथे अमेरिकेने हवाई हल्ले केले. अमेरिकन सैन्याने 'फुएर्ते तिउना' आणि 'ला कार्लोटा' सारख्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या कारवाईमुळे दक्षिण अमेरिकेसह संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे