बाळासाहेबांच्या पश्चात त्यांच्या पुत्राने ठाकरे ब्रँड संपवला

मंत्री नितेश राणे यांची टीका; उबाठाचा महापौर झाला, तर मुंबईत उर्दू शाळा वाढतील


मुंबई : “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात त्यांच्या पूत्राने ठाकरे ब्रँड संपवला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यापासून ठाकरे ब्रँड संपायला सुरुवात झाली. आता १५ जानेवारीनंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचे सुद्धा होणार नाहीत, हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळल्यामुळे, लोक त्यांना सोडून चालले आहेत. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सांगेन, शरीराची क्षमता थोडी वाढवा ‘अभी खेल बाकी है’”, असा खोचक राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी लगावला.


सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. राणे म्हणाले, “मुंबई महापालिकेत महापौर हा हिंदू, मराठी आणि महायुतीचाच होईल. आम्ही हिंदू आहोत ‘उर्दू’ नाही. उबाठाच्या विचारांचा महापौर बसला, तर मुंबईत उर्दू शाळा वाढतील, उर्दू भवन तयार होईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांच्या पत्रावर मुंबईत उर्दू भवन सुरू करण्याचे काम सुरू केले होते. मुंबईत उर्दू शाळा आणि मराठी शाळांची संख्या बघा, ठाकरेंची सत्ता आली तर ते मराठी शाळा बंद करून उर्दू शाळा सुरू करतील”.



येत्या १५ दिवसांत मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होणार


चिपी विमानतळासंदर्भात मंत्री नितेश राणे म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चिपी हे अतिशय महत्त्वाचे विमानतळ आहे. विमानाच्या माध्यमातून पर्यटक येथे यावेत, आर्थिक सक्षमता वाढावी, याच हेतूने खासदार नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची स्थापना केली. या विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळाली आहे. शिवाय मोठी विमाने सुद्धा उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या १५ दिवसात मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मंत्री राणेंनी यावेळी सांगितले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनी ओरोस येथे ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ याबाबत केलेल्या आंदोलनाची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली. “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता वेगळे निकष लावावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात साक्षरतेत प्रथम आहे. त्यामुळे यावर आम्ही लवकरच तोडगा काढू”, असे आश्वासन त्यांनी दिले.

Comments
Add Comment

CJI Surya Kant Advice to Young Lawyers : केवळ कायदेतज्ज्ञ बनू नका, तर समाजाचे 'संदेशवाहक' व्हा; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे युवा वकिलांना आवाहन

बंगळुरू : कायद्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारे भावी वकील केवळ पुस्तकी ज्ञानावर मोठे होत नाहीत, तर त्यांच्याकडे

महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्स मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, IPL 2027 च्या स्पर्धेत मुख्य प्रशिक्षकपदाचा शर्यतीत कोण?

मुंबई: IPL 2027 च्या आधी मुंबई इंडियन्स टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने

Fake Whatsapp App : सावध राहा! खऱ्यासारखाच दिसणारा 'व्हॉट्सॲप'चा फेक ॲप ठरतोय धोकादायक; जाणून घ्या संपूर्ण प्रकार.

जगभरात कोट्यवधी लोकांच्या मोबाईलमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले' लोकप्रिय मेसेजिंग ॲप 'व्हॉट्सॲप'बाबत (WhatsApp) एक

IPL 2027 : आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! श्रीलंकेचा हा दिग्गज गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त

IPL 2027 : आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघबांधणीत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्रीलंकेचे माजी

Nashik : नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण, 24 तासात कधीही धान्य मिळणार

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं लोकार्पण करण्यात आले आहे.

Salman Khan: 60व्या वर्षीही भाईजानचा दबदबा कायम! सलमानच्या वक्तव्याने वेधलं लक्ष जाणून घ्या भाईजान असं म्हणाला तरी काय?

सलमान खानने गेलया तीन दशकांहून अधिक काळ 'भाईजान' म्हणून बॉलीवूड विश्वात अधिराज्य गाजवले आहे. ९० च्या दशकात ऍक्शन