HDFC Quarterly Results Update: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा मजबूत निकाल जाहीर तरीही शेअर १.७२% कोसळत बंद

मोहित सोमण: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर बँकेच्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेतील अँडव्हान्स अथवा कर्जात ९% वाढ झाल्याचे बँकेने जाहीर केले आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेच्या गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २६२७६ अब्जावरून या डिसेंबर महिन्यात २८६३९ अब्जावर वाढ झाली आहे. तसेच बँकेच्या एकूण सरासरी ठेवीत (Average Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या २४५२८ अब्जावरून या डिसेंबरपर्यंत १२.२% वाढ झाली असून ते २७५२४ अब्जावर पोहोचल्याचे बँकेने आकडेवारीत स्पष्ट केले आहे.


उपलब्ध माहितीनुसार, बँकेच्या मुदतठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या डिसेंबरमधील १६३५२ अब्ज रूपयांवरून या डिसेंबरपर्यंत १३.४ वाढ झाली असल्याने ते १८५३९ अब्जावर पोहोचले. बँकेच्या कासा ठेवीत (CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ९.९% वाढ झाली. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ८१७६ अब्जाच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ८९८४ अब्जावर वाढ झाली. तर बँकेच्या एकूत मुदत ठेवीत (Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील १६३५२ अब्ज रूपयावरून १३.४% वाढ नोंदवल्याने या डिसेंबरमध्ये ठेवी १८५३९ अब्जावर पोहोचल्या आहेत.


बँकेच्या कालावधी कासा ठेवीत (Period End CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १०.१% वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ८७२७ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ९६१० अब्जावर पोहोचल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बँकेच्या मुदत ठेवी अंदाजे १८९८५ अब्ज होत्या, ज्या ३१ डिसेंबर २०२४ रोजीच्या १६९११ अब्जच्या तुलनेत सुमारे १२.३% वाढ नोंदवत आहेत. बँकेच्या मजबूत निकालानंतरही शेअर्समध्ये आज २.३१% घसरण झाल्याने प्रति शेअर अखेरच्या सत्रात ९७८.५० रूपयाला स्थिरावला आहे. ब्रोकरेजने बँकेच्या आर्थिक फंडांमेटलमध्ये काही प्रश्न उपस्थित केल्याने शेअरला गुंतवणूकदारांनी नकारात्मक कौल दिला. उत्कृष्ट  कामगिरी असून विश्लेषकांनी शेअरच्या घसरणीमागील मुख्य कारण म्हणून कर्ज-ठेव गुणोत्तर (LDR) आहे. या तिमाहीत LDR मध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ होऊन ते जवळपास ९९.००% झाले आहे. गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये १% तर १ वर्षात बँकेच्या शेअर्समध्ये २.४७% घसरण झाली आहे. तर संपूर्ण वर्षभरात बँकेच्या शेअर्समध्ये मात्र १४.४१% वाढ झाली असून इयर टू डेट (YTD) बेसिसवर बँकेच्या शेअर्समध्ये १.७२% घसरण झाली आहे.


 

 
Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.