उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त; भेटीगाठी, देवदर्शन, प्रचार फेऱ्यांनी वातावरण निवडणूकमय

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभागांतील उमेदवारी अंतिम झाल्यानंतर पहिल्या रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींना वेग दिला. सकाळी ७वाजल्यापासूनच उमेदवारांनी मतदारांना गाठणे सुरू केले. त्यात प्रामुख्याने सोसायट्यांच्या बैठका व प्रचार फेऱ्यांचा समावेश होता. प्रचारासाठी मोजकेच दिवस असल्याने रविवारी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू होती. प्रमुख राजकीय पक्षांकडून मतदारसंघात आता नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाकाही सुरू आहे. रविवार सार्थकी लावण्यासाठी बोरीवली, चारकोप, मालाड, कांदिवली, मागाठाणे आणि दहिसर या उत्तर मुंबईतील मतदारसंघांतील उमेदवारांनी दिवसभर जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेतल्या. काही उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांऐवजी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. सोसायट्यांमधील एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी उमेदवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत फिरत होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ वाजता प्रचाराला सुरुवात होऊन रात्री १० वाजेपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात होते.

Comments
Add Comment

हिंदूराष्ट्राला इस्लामिक बनवण्यासाठी हलालच्या पैशांचा वापर; मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : “हलाल प्रमाणपत्रांच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हिंदू समाजाला दुर्बल करण्यासाठी आणि भारताला

परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका

मुंबई: “विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत

Delhi Tiranga March : दिल्लीतील तिरंगा मोर्चामागचे राजकारण तपासा - मंत्री नितेश राणे

मुंबई : “उमर खालिदच्या समर्थनार्थ उभे राहणारे लोक आधी पाकिस्तानचे झेंडे फडकवत होते, ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या

जनाब संजय राऊत माफीवीर! भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल; महाराष्ट्रासह देशातील जनतेचीही माफी मागण्याची मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट