आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जानेवारीला ठाण्यात येत आहेत. शहराच्या विकासाबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा आणि ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीवर चर्चा करण्यासाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ७ वाजता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी याबाबत माहिती दिली.


ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) महायुतीच्या माध्यमातून लढत होत असून, केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाण्याचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या चर्चासत्रात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी केले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

Thane Water Cut: पुण्यानंतर आता ठाण्यातही पाणीकपात, 24 तास राहणार पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका?

ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. MIDC मार्फत महापालिका क्षेत्रात होणार्‍या परिसरात पाणी पुरवठा बंद

ठाणे जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार, स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अण्णा बनसोडे यांचे निर्देश...

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर

रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ठाणेकरांच्या मनामध्ये असलेल्या

Kalyan Traffic: नवरात्रीनिमित्त अवजड वाहनांना कल्याणमध्ये निर्बंध, 7 मार्गांवर असणार प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?

ठाणे: कल्याण शहरामध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. दुर्गाडी