हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!

आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर


दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीनुसार भारतीय संघाच्या क्रमवारीत काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजीच्या क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली आहे, तर अष्टपैलू दीप्ती शर्माला गोलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेतील अंतिम सामन्यात हरमनप्रीतने ४३ चेंडूंत ६८ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. याच उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ती फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी वर चढली असून, आता ती १३व्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्ती शर्मासाठी मात्र ही क्रमवारी निराशाजनक ठरली. तिला ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडने मागे टाकले आहे. दीप्ती आता टी-२० गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. सदरलँडकडे आता ७३६ रेटिंग पॉइंट्स आहेत, तर दीप्ती तिच्यापासून केवळ एक पॉइंट मागे आहे. तरीही दीप्ती अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.


या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय संघाच्या काही प्रमुख खेळाडूंना पुढील सामन्यांमध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान असणार आहे.


इतर भारतीय खेळाडूंची स्थिती


स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी फलंदाजीच्या क्रमवारीत अनुक्रमे तिसरे आणि सहावे स्थान कायम राखले आहे.


जेमिमा रॉड्रिग्ज टॉप-१० मधून बाहेर पडली असून १२व्या स्थानावर गेली आहे.


जलद गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर पाच स्थानांनी घसरली असून, ती देखील आता टॉप-१० गोलंदाजांच्या यादीत नाही.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात