Katrina Kaif And Vicky Kaushal : "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा किरण..." अखेर समोर आलं ज्युनिअर कौशलचं नाव

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस बाळाला जन्म दिला होता. आता नुकताच कतरिनाने सोशल मीडियावर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर करत आपल्या लेकाचे नाव 'विहान कौशल' (Vihaan Kaushal) असल्याचे जाहीर केले आहे.



प्रार्थनांना मिळालं फळ




कतरिनाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विकी कौशलचा हात, तिचा हात आणि तिच्या हातावर लाडक्या लेकाचा हात असा गोंडस फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मुलाच्या नावाचा उल्लेख करत लिहिले की, "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा किरण - विहान कौशल. आमच्या प्रार्थनांना आज उत्तर मिळाले आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि एका क्षणात आमचे जग पूर्णपणे बदलून गेले आहे." कतरिनाने या पोस्टमधून आई झाल्याचा आनंद व्यक्त करताना देवाचे आभार मानले आहेत. तिने पुढे म्हटले की, "शब्दांच्या पलीकडे असलेली ही कृतज्ञता आहे."



'विहान' नावाचा खास अर्थ


कतरिना आणि विकीने आपल्या मुलासाठी निवडलेल्या 'विहान' या नावाचा अर्थ 'पहाट' किंवा 'सूर्याचा पहिला किरण' असा होतो. कौशल कुटुंबात एका नवीन पर्वाची सुरुवात झाल्याचे संकेत या नावातून मिळत असल्याचे चाहते म्हणत आहेत. कतरिनाने ही पोस्ट शेअर करताच अवघ्या काही तासांत लाखो चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करत या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.



सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस


आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांसारख्या बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी कतरिना आणि विकीचे अभिनंदन केले आहे. कतरिनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांनी "ज्युनिअर कौशलची पहिली झलक कधी पाहायला मिळणार?" अशी विचारणा सुरू केली आहे. कतरिना आणि विकीचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले होते आणि आता ४ वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

Comments
Add Comment

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर