"बॅायप्रेंडकडे घर-भाडं भरायला पैसे नाहीत" म्हणून गर्लफेंडने बनवला जबरदस्त प्लॅन, मारला काकाच्या...

पुणे : हल्ली चोरीचे प्रकरण वाढत आहे त्यातच नवीन प्रकरण असं की बॅायफ्रेंडकडे घर भाड ३० हजार भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणुन प्रेयसीनेच आपल्या स्वताच्या काकाच्या घरावर चोरी करायचा प्लॅन केला..पण पोलीसांनी प्रियकरासह व दोन साथीदार तरुणांना अटक केली आहे.. यश मोहन कुऱ्हाडे, (वय २०), ऋषभ प्रदीप सिंह (वय २१) आणि राज विवेक भैरामडगीकर (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली.


घटना कल्याणीनगरमधील तक्रारदाराच्या बंगल्यात सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. दोन अनोळखी व्यक्ती चाकू आणि दोरी घेऊन बंगल्यात शिरल्याने घरातील महिला घाबरल्या; मात्र, त्यांनी जोरात आरडाओरडा केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला आणि आरोपी पळून गेले.


पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, कुऱ्हाडे आणि त्याचा मित्र या प्रेयसीच्या कटानुसार दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात आले होते. आरोपीकडे घराचे दार उघडे ठेवलेले होते, त्यामुळे आरोपी सहज घरात शिरू शकले. कुऱ्हाडे बारावी नापास असून, ऋषभ मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि भैरामडगीकर हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकतो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.चौकशीत समोर आले की, कुऱ्हाडे आणि प्रेयसी यांच्यात प्रेमसंबंध असून घरभाड्याच्या तंगीमुळे प्रेयसीनेच हा कट रचला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आणि आवश्यक ती कारवाई करण्यास सज्ज आहेत.

Comments
Add Comment

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Lucknow Crime: धक्कादायक! लग्नास नकार दिल्याने तरुणीवर ॲसिड हल्ला, कुटुंबीयांवरही जीवघेणा हल्ला

Lucknow Crime: उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका 18 वर्षीय तरुणीवर ॲसिड फेकल्याची

Telangana Crime : पतीसोबत वाद झाला अन् संतापाच्या भरात आईने थेट तीन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत फेकलं पुढे...

Telangana Crime : तेलंगणामधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर एका महिलेने आपल्या तीन

AI Chatbot: एआय चॅटबॉटचा धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलांशी अश्लील संवाद,ॲपलने अ‍ॅप हटवलं

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याच्या गैरवापराबाबतही गंभीर प्रश्न

Ahilyanagar Crime : नगरमध्ये 550 किलो गोमांस जप्त

अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोमांस विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा

Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, 60 वर्षीय महिलेला गर्दुल्यांने मारहाण करत अत्याचार

मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघत असल्याचे पुन्हा एकदा समोर