४ दिवसात गुंतवणूकदार बरबाद? २२०० पूर्णांक घसरल्याने गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स ६०४.७२ व निफ्टी १९३.५५ अंकाने कोसळला

मोहित सोमण: आज सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसात गुंतवणूकदारांनी ९.१९ लाख कोटी गामवले असून गेल्या ४ दिवसात २२०० पेक्षा अधिक अंकाने म्हणजेच जवळपास २.५% बाजार कोसळल्याने बाजारात मोठी पडझड झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज घसरण झाल्याने सेन्सेक्स ६०४.७२ अंकाने कोसळत ८३५७६ व निफ्टी १९३.५५ अंकाने कोसळत २५६८३.३० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही सकाळपेक्षाही घसरण वाढल्याने बाजार टेक्निकली 'बियरिश' स्तरावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.


क्षेत्रीय निर्देशांकातील रिअल्टी, एफएमसीजी, ऑटो, प्रायव्हेट बँक, मिडिया, कंज्यूमर ड्युरेबल्स निर्देशांकात मोठी घसरण झाली असून आयटी, तेल व गॅस, पीएसयु बँक निर्देशांकातील वाढीमुळे निर्देशांकात किरकोळ आधार मिळाला आहे. तरीही युएस व्हेनेझुएला यांच्यातील वादानंतर आता युएस भारतावर ५००% कर लादण्याचा तयारीत असल्याने बाजारात मोठी अस्थिरता कायम राहिली. सकाळच्या सत्रातील अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ०.३०% पातळीवर संध्याकाळपर्यंत ३.०६% पातळीवर पोहोचला आहे. यासह लार्जकॅपसह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. युएस बाजारातील आगामी पेरोल आकडेवारीपूर्व अस्थिरता आशियाई व भारतीय बाजारात अस्थिरता राहण्यासाठी परावर्तित झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नॅशनल अँल्युमिनियम (४.३६%), हिंदुस्थान झिंक (२.६६%), लीला पॅलेस हॉटेल (२.४७%),ऑईल इंडिया (२.४६%), कोफोर्ज (२.१०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण इलेकॉन इंजिनिअरिंग (१५.८५%), आयईएक्स (७.८२%), मन्नपूरम फायनान्स (७.६६%), टीआरआयएल (५.९०%), एथर एनर्जी (५.८६%), तेजस नेटवर्क (५.५६%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात दिवसाच्या उच्चांकावरून विक्रीचा दबाव दिसून आला. बेंचमार्क निफ्टी निर्देशांक २५८४० वर उघडला, त्याने २५९४० चा इंट्राडे उच्चांक गाठला आणि त्यानंतर नफावसुलीमुळे तो घसरून २५६४८ च्या इंट्राडे नीचांकावर पोहोचला. क्षेत्रनिहाय पाहिल्यास, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, तेल आणि वायू, माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि धातू या क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली, तर स्थावर मालमत्ता, खाजगी बँका, वित्तीय सेवा, एफएमसीजी आणि ग्राहक टिकाऊ वस्तू या क्षेत्रांमध्ये कमजोरी दिसून आली. व्यापक आर्थिक आघाडीवर, सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या देशांतर्गत महागाईच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील सहभागी सावध राहिले. जागतिक आघाडीवर, अमेरिकन शुल्काच्या वैधतेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी बाजारातील सहभागी सावध भूमिकेत राहिले. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुट्निक यांनी शुक्रवारी भारत-अमेरिका व्यापार करार लांबणीवर पडल्याचे संकेत दिल्यानंतर बाजारातील भावनांना आणखी धक्का बसला. डेरिव्हेटिव्ह आघाडीवर, ३६ वाढणाऱ्या शेअर्सच्या तुलनेत १७६ घसरणाऱ्या शेअर्समुळे बाजाराची स्थिती नकारात्मक राहिली. POWERINDIA, BHEL, IEX, BIOCON आणि CGPOWER मध्ये सर्वाधिक ओपन इंटरेस्टची भर पडली. निफ्टी ऑप्शन्स सेगमेंटमध्ये २६००० आणि २६१०० स्ट्राइक प्राइसेसवर सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट आहे तर २५७०० आणि २५६०० स्ट्राइकवर सर्वाधिक पुट ओपन इंटरेस्ट आहे. निफ्टी पुट-कॉल रेशो (PCR) सध्या ०.५२ आहे.'

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.