उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी


मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी बेकायदेशीरपणे पाणी,कर, पोलीस अशी विविध 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) सादर करण्याची सक्ती करतात. यापैकी एखादी एनओसी नसल्यास थेट उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांमुळ; फेटाळण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या या मनमानी निर्णयाविरोधात एका अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे. तसेच, या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने यावर निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.


आगामी मुंबई महापालिका आगामी निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यंदा उमेदवारांना विविध एनओसी सादर करण्याची सक्ती केलीय. यात पाणीपट्टी, विविध कर, पोलीस अशा सरकारी विभागांची ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) उमेदवारी अर्जासोबत सादर करणं अनिवार्य केलंय. तसंच ज्यांच्याकडे ही प्रमाणपत्रं नाहीत, त्यांचे अर्ज फेटाळून लावण्यात आलेत. अशा पद्धतीनं केवळ तांत्रिक आणि नियमबाह्य कारणास्तव थेट उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं फेटाळणं हे योग्य नाही. अपक्ष उमेदवार मोझम अली मीर यांनी याप्रकरणी वकील मोईनुद्दीन चौधरी यांच्यामार्फत ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय.


या एनओसी नसल्यास अर्ज फेटाळण्याचा आदेश रद्द करण्यात यावा. तसंच एनओसी नसल्यामुळं फेटाळलेल्या अर्जांचा तातडीनं पुनर्विचार करून त्या स्वीकारण्या याव्यात, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकून घेत याप्रकरणी निवडणूक आयोगाला तातडीनं उत्तर देण्याचे निर्देश जारी करत शुक्रवारी यावर सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. तसेच, याबाबत निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.