Crime News: समलिंगी संबंधातून वाद,नंतर हत्या; नक्की काय घडलं ?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक आणि पाया खालची जमीन सरकवून टाकणारी घटना समोर आली आहे. समलिंगी संबंधातील वादातून एका महिलेने आपल्या मैत्रिणीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री सांताक्रूझ (पश्चिम) परिसरातील एका घरात घडली. या प्रकरणी पोलीसांनी कमला संजय कांबळे उर्फ प्रीती (वय ३५) हिला अटक केली असून न्यायालयाने तिला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणामुळे तेथील परिसरांमध्ये खळबळ माजली आहे.


नक्की काय आहे प्रकरण ?
ही घटना मुंबईतील सांताक्रुझ मधील आहे..म़त तरुणीचे नाव रेश्मा ढोणे होते व तिचे वय ३७ होते .दोघीजन ही एकमेकाला दहा वर्षाहून ओळखत होत्या असं माहितीतुन समोर आले आहे.दोन्ही ही महीला घर काम करुन गुजराण करत होत्या.प्राथमिक तपासात दोघी रिलेशनशीपमध्ये असल्याचं समोर आलं आहे. पूर्वीच्या भांडणामुळे त्यांच्यामध्ये तणावपूर्ण संबंध असल्याचे समजले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री कमलाच्या घरी पार्टी सुरू असताना रात्री साडेअकराच्या सुमारास रेश्मा घरी न आल्याच्या कारणावरून दोघींमध्ये वाद पेटला. “आली का नाहीस तू घरी?” या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हाणामारीत रूपांतर झाला. रागाच्या भरात कमलाने घरात पडलेला चाकू उचलून रेश्माच्या छातीत वार केला.


रेश्माच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रेश्माच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

Ulhasnagar murder : थरारक! उल्हासनगरमध्ये हरेश गिजवानी यांची गोळी झाडून हत्या; अवघ्या दोन तासांत पोलिसांची धडक कारवाई

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवारी रात्री गोळीबार करून हरेश गिजवानी यांची

Chhatrapati Sambhajinagar : मी सरकारी अधिकारी ! खोटं बोलून लग्न उरकलं ; सत्य समोर येताच नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शासकीय सेवेत अधिकारी असल्याचे खोटे

'निळा ड्रम' मर्डर मिस्ट्रीचा थरारक शेवट! पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि प्रियकराला थेट फाशी, नेमकं काय घडलं होतं?

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाजलेल्या बहुचर्चित आणि थरारक ‘निळा ड्रम’ हत्या प्रकरणात न्यायालयाने अखेर निकाल

नालासोपाऱ्यात खळबळ! नवरात्रोत्सवाच्या वादात आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडले 150 हून अधिक अश्लील व्हिडिओ; तरुणीची तक्रार दाखल

वसई-विरार : महाराष्ट्रातील नालासोपाऱ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात आणखी एक हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून आयटी कर्मचारी महिलेची आत्महत्या

पुण्यातील ३३ वर्षीय आयटी इंजिनिअर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या

Pune Crime: मालक समजून कर्मचाऱ्याचा खून! पुण्यातील रांजणगावात थरार

पुण्यातील रांजणगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाणीपुरवठा प्रकल्पाचा मालक समजून दुसऱ्याच