Metro News: दहिसर मेट्रो स्थानकावर मुंबईतील पहिला ‘पेड एरिया इंटरचेंज’; मिरा रोड–अंधेरी थेट प्रवास शक्य

मुंबई :मुंबईकराचं मेट्रो प्रवास अधिक सुखदायी होणार आहे. मुंबईतील मेट्रो सेवेचा विस्तार वेगाने सुरू असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत पहिल्यांदाच मेट्रो स्थानकाच्या आतूनच मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ‘पेड एरिया इंटरचेंज’ नावाची ही सुविधा दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर सुरू झाली असून, त्यामुळे प्रवाशांना आता स्थानकाच्या बाहेर न पडता थेट एका मेट्रो मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर जाणे शक्य झाले आहे.

ही सुविधा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत विकसित करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये या इंटरचेंजचे कमिशनिंग करण्यात आले होते. आवश्यक CMRS सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता फेज 1 पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. दहिसर पूर्व मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील टोकाला उभारण्यात आलेल्या या इंटरचेंजमुळे मेट्रो लाईन 7, मेट्रो लाईन 2A आणि मेट्रो लाईन 9 (फेज 1) एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत.या नव्या सुविधेमुळे दहिसर ते अंधेरी तसेच मिरा-भाईंदर ते मुंबईच्या मध्यवर्ती भागांपर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे आता मेट्रो लाईन 1 आणि मेट्रो लाईन 7 दरम्यानही थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे.

मेट्रो लाईन 9 चा फेज 1 हा 4.5 किलोमीटर लांबीचा असून दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशिगाव या चार स्थानकांचा समावेश आहे. या सेवेमुळे मिरा-भाईंदरमधील प्रवासी काशिगाव येथून मेट्रोत प्रवेश करून कोणतीही मेट्रो बदलण्याची गरज न पडता थेट अंधेरीपर्यंत प्रवास करू शकणार आहेत. या बदलामुळे मिरा रोड ते अंधेरी या प्रवासाला दीड तास लागत होते पण आता तोच प्रवास, 50 मिनिटांपेक्षा कमी झाला आहे. परिणामी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे व दहिसर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, अधिकाधिक प्रवासी मेट्रोकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
Comments
Add Comment

Palghar Gas Leakage : पालघरमध्ये हायड्रोजन गॅसची गळती! मुंबई-गुजरात महामार्गावर १२ तासांचे थरारक आपत्कालीन ऑपरेशन

१३ सिलिंडरची गळती रोखली, १६० सिलिंडर सुरक्षित स्थळी हलवले मुंबई : मुंबई-गुजरात (Mumb

Palghar Wall Collapse : वाड्यात कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश

पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कारखान्यातील भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

बाईईईई हा काय प्रकार! डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड ? शाळा प्रशासनाचा अजब अट्टाहास

मुंबई : मिरा-भाईंदर (Mira-BHayandar) परिसरातील शाळांमध्ये पर्यूषण पर्वाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आहारावर लादल्या

गणेशोत्सव २०२६ : खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रयत्नांना यश! वसई-विरार महापालिकेकडून विसर्जन जेट्टीसह विशेष सुविधांची घोषणा

पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (Hemant Sawra) यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक

Eknath Shinde : पालघरच्या रुग्णालयातील मारहाण प्रकरण : उपमुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

पालघर : पालघरमधील (Palghar News) एका खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि तेथे गोंधळ घालणे

Vasai factory accident : वसईमध्ये कारखान्यात मोठी दुर्घटना : ट्रान्सफॉर्मरचा रेडिएटर अंगावर पडल्याने ५४ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू!

वसई : वसईतील कामण (नायगाव पूर्व) येथील एका कारखान्यात कामगाराच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी