मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले. संध्याकाळपर्यंत ५४ लाख ७६ हजार ४३ मतदारांनी मतदान केले. मुंबईत २९ लाख २३ हजार ४३३ पुरुष आणि २५ लाख ५२ हजार ३५९ महिला तसेच २५१ इतर मतदारांनी मतदान केले.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार नोंदणीकृत असून, यामध्ये ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष, ४८ लाख २६ हजार ५०९ महिला आणि १ हजार ९९ इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाची गती मंद होती, मात्र दुपारनंतर मतदानात वाढ झाली.


काही भागांमध्ये मतदान केंद्र बदलण्यात आल्याने मतदारांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदार यादीत नावे नसणे, तसेच मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२७ प्रभागांसाठी सुमारे १,७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारनंतर मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


वेळेनुसार मतदानाची टक्केवारी :


▪ सकाळी ९.३० वाजेपर्यंत – ६.९८%
▪ सकाळी ११.३० वाजेपर्यंत – १७.७३%
▪ दुपारी १.३० वाजेपर्यंत – २९.९६%
▪ दुपारी ३.३० वाजेपर्यंत – ४१.०८%
▪ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत – ५२.९४%

Comments
Add Comment

Wastewater Reuse : सोसायट्यातील झाडांना सांडपाणी किंवा वापरानंतरच्या पाण्याचा वापर करा, महापालिकेने केले गृहनिर्माण संस्थांना आवाहन

मुंबई विशेष प्रतिनिधी झाडांना पाणी देताना शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी सांडपाणी

Draft Voter List 2026 : प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी

BMC : प्रकल्प कामे अंतिम टप्प्यात, महापालिकेचा मुदतठेवींना हात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या रकमेची चर्चा कायमच होत असते. मार्च महिन्यात मुदत

Nalasopara fire : नालासोपाऱ्यात इम्पीरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

नालासोपारा : मुंबईजवळील नालासोपारा येथील इम्पीरियल हाइट्स ( Imperial Heights) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 24 विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारतीय इतिहासात 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला दिवस

मंत्री नितेश राणे यांनी मांडला महाराष्ट्राच्या सागरी विकासाचा आराखडा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्रातील सागरी