Wastewater Reuse : सोसायट्यातील झाडांना सांडपाणी किंवा वापरानंतरच्या पाण्याचा वापर करा, महापालिकेने केले गृहनिर्माण संस्थांना आवाहन

धोकादायक झाडे व कमकुवत फांद्यांबाबत त्वरित संपर्क साधण्‍याचे आवाहन

मुंबई विशेष प्रतिनिधी


झाडांना पाणी देताना शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मधून प्रक्रिया केलेले, झाडांसाठी योग्य आणि सुरक्षित असलेले पुनर्वापरयोग्य पाणी वापरण्यास प्राधान्य द्यावे. तसेच, इतर वापरानंतर उपलब्ध होणारे योग्य व सुरक्षित पाणीही आवश्यक ती काळजी घेऊन झाडांसाठी वापरता येऊ शकते. पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा नियोजनबद्ध वापर केल्यास जलसंधारणास हातभार लागण्याबरोबरच झाडांच्या निगेसाठीही मदत होऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी आपल्या आवारातील झाडांची संख्या, त्यांची स्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे. दरम्यान, झाडांची धोकादायक लक्षणे दिसून आल्यास त्वरीत महापालिकेला कळवण्याचे प्रशासनाचे आवाहन


मुंबई शहर व उपनगरांमध्ये झाडे तसेच झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांना आपल्या परिसरातील झाडांची योग्य निगा राखण्याचे जाहीर आवाहन करण्‍यात येत आहे. हवामानातील बदल, वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता यांमुळे झाडांवर ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, झाडांना आवश्यकतेनुसार पाणी देणे, त्यांची नियमित देखभाल करणे आणि धोकादायक झाडे अथवा कमकुवत फांद्यांची वेळेत माहिती देणे आवश्यक असल्याचे महानगरपालिकेने नमूद केले आहे.



मुंबईतील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि नागरिकांना सावली व शुद्ध हवा उपलब्ध करून देण्यात वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत झाडांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः पाण्याची कमतरता जाणवत असल्यास झाडांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरते. यासाठी नागरिकांनी तसेच गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


झाडे आणि त्यांच्या फांद्या पडण्याच्या घटना टाळण्यासाठी केवळ पाणी देणे पुरेसे नसून झाडांची नियमित पाहणी आणि योग्य देखभाल करणेही आवश्यक आहे. झाडांच्या बुंध्याची स्थिती, फांद्यांची मजबुती, झाडाला आलेला कोरडेपणा तसेच फांद्यांमध्ये दिसणारी कमकुवतपणाची लक्षणे यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरातील झाडांची वेळोवेळी पाहणी करावी. झाडाच्या बुंध्याला भेगा पडणे, झाड एका बाजूला झुकणे, मोठ्या फांद्या सुकणे किंवा तुटण्याच्या स्थितीत असणे, तसेच झाडाची मुळे उघडी पडणे यांसारखी संभाव्य धोक्याची चिन्हे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा प्रकारची धोकादायक लक्षणे आढळल्यास संबंधित झाडाची माहिती तातडीने मुंबई महानगरपालिकेला कळवावी, असे आवाहन करण्‍यात येत आहे.

Comments
Add Comment

Draft Voter List 2026 : प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी

BMC : प्रकल्प कामे अंतिम टप्प्यात, महापालिकेचा मुदतठेवींना हात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या रकमेची चर्चा कायमच होत असते. मार्च महिन्यात मुदत

Nalasopara fire : नालासोपाऱ्यात इम्पीरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

नालासोपारा : मुंबईजवळील नालासोपारा येथील इम्पीरियल हाइट्स ( Imperial Heights) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 24 विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारतीय इतिहासात 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला दिवस

मंत्री नितेश राणे यांनी मांडला महाराष्ट्राच्या सागरी विकासाचा आराखडा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्रातील सागरी

FDA Raids : बीड व छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त, तर मुंबईत 'डॉमिनोज पिझ्झा'सह 3 आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध