मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले. आज म्हणजेच शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी साडेदहा पर्यंत टपाली मतमोजणीच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने १२, शिवसेनेने १०, उबाठाने ९, मनसेने ६, काँग्रेसने ५, इतरांनी चार जागांवर आघाडी घेतली आहे. ही अगदी सुरुवातीचा आघाडी आहे.



मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान


मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले. संध्याकाळपर्यंत ५४ लाख ७६ हजार ४३ मतदारांनी मतदान केले. मुंबईत २९ लाख २३ हजार ४३३ पुरुष आणि २५ लाख ५२ हजार ३५९ महिला तसेच २५१ इतर मतदारांनी मतदान केले.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार नोंदणीकृत असून, यामध्ये ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष, ४८ लाख २६ हजार ५०९ महिला आणि १ हजार ९९ इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाची गती मंद होती, मात्र दुपारनंतर मतदानात वाढ झाली.


काही भागांमध्ये मतदान केंद्र बदलण्यात आल्याने मतदारांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदार यादीत नावे नसणे, तसेच मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.



मुंबई अशी सुरू आहे मतमोजणी



  1. मुंबई शहरात एकूण २३ मतमोजणी अधिकारी आहेत.

  2. प्रत्येक अधिकारी साधारण दहा वॉर्डची जबाबदारी सांभाळणार

  3. एकावेळी केवळ दोन वॉर्डची मतमोजणी होणार, यामुळे पहिल्या टप्प्यात ४६ नंतर दुसऱ्या टप्प्यात ४६ या पद्धतीने मतमोजणीचे नियोजन आहे. जर कोणताही आक्षेप आला नाही तर पाच टप्प्यात मतमोजणी पूर्ण होईल. पण आक्षेप आल्यामुळे एखाद्या मतदारसंघाची मतमोजणी नव्याने करावी लागली अथवा विशिष्ट ईव्हीएमची मतमोजणी पुन्हा केली तर या प्रक्रियेत खर्ची होणार असलेल्या वेळेमुळे मतमोजणीस विलंब होणार आहे.

Comments
Add Comment

Draft Voter List 2026 : प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी

BMC : प्रकल्प कामे अंतिम टप्प्यात, महापालिकेचा मुदतठेवींना हात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या रकमेची चर्चा कायमच होत असते. मार्च महिन्यात मुदत

Nalasopara fire : नालासोपाऱ्यात इम्पीरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

नालासोपारा : मुंबईजवळील नालासोपारा येथील इम्पीरियल हाइट्स ( Imperial Heights) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 24 विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारतीय इतिहासात 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला दिवस

मंत्री नितेश राणे यांनी मांडला महाराष्ट्राच्या सागरी विकासाचा आराखडा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्रातील सागरी

FDA Raids : बीड व छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त, तर मुंबईत 'डॉमिनोज पिझ्झा'सह 3 आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध