मुलाने जन्मदात्या आईलाच बंदुकीने गोळी मारून संपविले

अणसूर मडकीलवाडीत खळबळजनक घटना


वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर मडकीलवाडी येथे मुलानेच जन्मदात्या आईवर बंदुकीने गोळी झाडून तिचा निर्दयी खून केला. मयत महिलेचे नाव वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५ वर्षे) असे आहे. तर या प्रकरणात दुष्कृत्त करणारा आरोपी मुलगा उमेश वासुदेव सरमळकर (वय ४०) असे त्याचे नाव आहे. दारूचे व्यसन आणि कर्जाच्या कारणावरून हा खून झाला आहे. या घटनेमुळे वेंगुर्ले तालुक्यासह सिंधुदुर्गात खळबळ उडाली. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यसनामुळे माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे या घटनेने समोर आले आहे. वेंगुर्ले तालुक्यात मुलानेच आईचा खून केल्याची ही पहिलीच दुर्घटना असून या दुष्कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अणसुर पाल मडकीलवाडी, वेंगुर्ला येथे घडली. या प्रकरणी मध्यरात्री वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद जागृती जयेश सरमळकर (मूळ राहणार अणसुर मडकीलवाडी, सध्या राहणार विनायक रेसिडेन्सी, कॅम्प वेंगुर्ला) यांनी दिली आहे.


आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतले होते. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. या कर्जाच्या कारणावरून आणि दारूच्या विषयावरून मयत आई व आरोपी मुलामध्ये वाद व भांडण होते. या कारणासह ती भावाच्या बाजूने जास्त आहे, या साऱ्या रागातून त्याने खून करण्याचे टोकाचे पाऊल उचलले, असा संशय आहे.


सदर खून प्रकरणातील संशयित आरोपी उमेश याच्या विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३(३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २७, २९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची तत्काळ अटक करण्यात आली. त्याला कुडाळ न्यायालया मध्ये हजर केले असता न्यायाधीशांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar murder : थरारक! उल्हासनगरमध्ये हरेश गिजवानी यांची गोळी झाडून हत्या; अवघ्या दोन तासांत पोलिसांची धडक कारवाई

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवारी रात्री गोळीबार करून हरेश गिजवानी यांची

Chhatrapati Sambhajinagar : मी सरकारी अधिकारी ! खोटं बोलून लग्न उरकलं ; सत्य समोर येताच नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शासकीय सेवेत अधिकारी असल्याचे खोटे

'निळा ड्रम' मर्डर मिस्ट्रीचा थरारक शेवट! पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि प्रियकराला थेट फाशी, नेमकं काय घडलं होतं?

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाजलेल्या बहुचर्चित आणि थरारक ‘निळा ड्रम’ हत्या प्रकरणात न्यायालयाने अखेर निकाल

नालासोपाऱ्यात खळबळ! नवरात्रोत्सवाच्या वादात आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडले 150 हून अधिक अश्लील व्हिडिओ; तरुणीची तक्रार दाखल

वसई-विरार : महाराष्ट्रातील नालासोपाऱ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात आणखी एक हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून आयटी कर्मचारी महिलेची आत्महत्या

पुण्यातील ३३ वर्षीय आयटी इंजिनिअर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या

Pune Crime: मालक समजून कर्मचाऱ्याचा खून! पुण्यातील रांजणगावात थरार

पुण्यातील रांजणगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाणीपुरवठा प्रकल्पाचा मालक समजून दुसऱ्याच