मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल


मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेवून हार्दिक अभिनंदन केले. राज्यातील २९  महापालिकांपैकी २६ महापालीकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रात सर्व महापालिकांमध्ये  महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरल्याचे सांगत ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.


मुंबई महापालिकेची निवडणुक ठाकरे बंधूंनी प्रतिष्ठेची निवडणुक केली होती. गेली २५ वर्ष उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मुंबई महापालीकेवर राज्य होते. मराठी भाषेचा भावनिक मुद्दा उपस्थित करुन उध्दव आणि राज या दोन बंधुनी मुंबई पालिकेची निवडणुक चुरशीची केली होती. या निवडणुकीच्या निकालाबाबत आपण आधीच सांगितले होते की, मुंबईत मराठी जनता ही भावनिक राजकारणाला भुलणार नाही. विकासाच्या मुद्दयांना मराठी जनता महत्व देईल.  मराठी भाषिक  जनतेने आणि मुंबईतील गैरमराठी जनतेने महायुतीला भरभरुन मतदान केले आहे. त्यामुळे महायुतीचा महाविजय झालेला आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर राज्य करु शकली ते केवळ भाजपच्या पाठिंब्यामुळे!२०१२ सालापासुन रिपब्लिकन पक्षाने शिवसेनेला शिवशक्ती -भिमशक्तीच्या माध्यमातुन पाठिंबा दिला होता. मात्र आता भाजप रिपाइं  ठाकरे सेने सोबत नसल्यामुळे शिवसेनेचा दारुण पराभव झालेला आहे. राज ठाकरे यांच्या युतीमुळे उध्दव ठाकरेंचा  फायदा होणार नाही; हे मी या आधीच सांगितले होते असे ना. रामदास आठवले म्हणाले.


राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ महापालिकेत महायुतीचा महाविजय होणार असल्याचा आपला अंदाज खरा ठरला असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे राज्यभरातील २९ महापालिकांमध्ये महायुतीने चांगली कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईत महायुतीचा महाविजय झाला असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले. महायुतीला महाविजय दिल्याबद्दल मुंबईकरांचे आणि राज्यातील जनतेचे ना. रामदास आठवले यांनी आभार मानले आहे. आंबेडकरी जनतेने आपला कौल महायुतीला दिल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेचेही आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने